दिल्लीतही ‘महाराष्ट्र पॅटर्न’ लागू, संजय राऊत यांचा भाजपवर हल्ला, काँग्रेसलाही कानपिचक्या
दिल्लीतही 'महाराष्ट्र पॅटर्न' लागू करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पाच वर्ष केजरीवाल यांना काम करू दिलं नाही. नायब राज्यपालांच्या हातात ताकद दिली. सर्व प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकलं. त्याचा हा परिणाम आहे. तुम्ही सर्वांना आत टाकाल आणि निवडणुका जिंकाल.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत असून 27 वर्षांनी राजधानीमध्ये बाजपचं कमळ फुलताना दिसत आहे. सत्ताधारी आप ला पुन्हा संधी देण्यास दिल्लीकरांनी नकार दिला असून काँग्रेसची तर अतिशय दारूण अवस्था आहे. याच निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठआकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या निकालावर भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतही ‘महाराष्ट्र पॅटर्न’ लागू करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पाच वर्ष केजरीवाल यांना काम करू दिलं नाही. नायब राज्यपालांच्या हातात ताकद दिली. सर्व प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकलं. त्याचा हा परिणाम आहे. तुम्ही सर्वांना आत टाकाल आणि निवडणुका जिंकाल. हा फॉर्म्युला महाराष्ट्रात झाला. दिल्लीत झाला आता बिहारमध्ये दिसत असल्याचे राऊत म्हणाले. एवढंच नव्हे तर काँग्रेस आणि आपचं मनोमिलन झालं असतं तर ही परिस्थिती आली नसती, असं सांगत राऊतांनी काँग्रेसलाही कानपिचक्या दिल्या आहेत. ते एकसाथ असते तर पहिल्या तासाभरातच भाजपचा पराभव झाला असता, असंही राऊत म्हणाले.
काय म्हणाले संजय राऊत ?
काल राहुल गांधी, सुप्रिया सुळे आणि मी पीसी घेतली. निवडणूक आयोगाची वर्तवणूक कशी आहे. कशा पद्धतीने फ्रॉड होत आहे. महाराष्ट्र पॅटर्न दिल्लीत लागू करण्यात आला आहे. त्याच पद्धतीने काम सुरू होतं. निवडणूक आयोग डोळे लावून बसला होता. महाराष्ट्रात पाच महिन्यात 39 लाख मतांचं काय होणार हे मला विचारलं. त्यावर मी सांगितलं ते बिहारमध्ये शिफ्ट होतील. काही दिल्लीत येतील. १० वर्षापासून मोदी दिल्लीत होते. मी असताना दिल्ली जिंकली पाहिजे असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे दिल्लीत विजय मिळवण्याचा प्रयत्न सुरू होता, असं संजय राऊत म्हणाले.
काँग्रेसलाही कानपिचक्या
या निवडणुकीत काँग्रेस आणि आपचं मनोमिलन झालं असतं तर ही परिस्थिती झाली नसती. आप आणि काँग्रेस यांचे स्पर्धक भाजप आहे.भाजपला हरवण्यासाठी आप आणि काँग्रेसही लढत आहे, पण स्वतंत्र लढत आहेत. एकसाथ असते तर पहिल्या तासाभरातच भाजपचा पराभव झाला असता असा दावा राऊतांनी केला. काँग्रेसने खातं खोललं. खाते खोलण्यासाठी सर्व मैदानात उतरतात, त्यातून शिकलं पाहिजे. पाच वर्ष केजरीवाल यांना काम करू दिलं नाही. नायब राज्यपालांच्या हातात ताकद दिली. सर्व प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकलं. त्याचा हा परिणाम आहे. तुम्ही सर्वांना आत टाकाल आणि निवडणुका जिंकाल. हा फॉर्म्युला महाराष्ट्रात झाला. दिल्लीत झाला आता बिहारमध्ये दिसत आहे. महाराष्ट्रातही मोठे नेते पिछाडीवर होते. पराभूत झाले. हा महाराष्ट्र पॅटर्न आहे. लीडरशीपला खतम करा. त्यांना पराभूत करा हा पॅटर्न होता, असं राऊतांनी नमूद केलं. लोक भाजपला मतदान करत नसल्याचा दावाही त्यांनी केला.
शिंदेंकडे अघोरी विद्या
फडणवीस यांनी महाराष्ट्राचा विचार करा. ते अजून राष्ट्रीय नेते झाले नाहीत. राहुल गांधी राष्ट्रीय नेते आहेत. तुम्ही बोगस मतदान करून जिंकले म्हणून नेता झाला. महाराष्ट्रात 39 लाख मतदार वाढले आणि सर्वच मते भाजपलाच कशी मिळाली ?. ही कोणती जादू आहे? हे कोणतं अघोरी कृत्य आहे?, हे फडणवीस यांनी सांगावं. एकनाथ शिंदेंकडे अघोरी विद्या आहे, जादू टोणा आहे. त्यांना विचारा. बोगस मतदान करता आणि आम्हाला ज्ञान देता, अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांना सुनावलं.
गंगेत डुबकी मारली म्हणजे कोणीही अमर होत नाही
शिंदे गट ड्युप्लिकेट गट आहे. अमित शाह नसतील तेव्हा काय करतील. अमृत पिऊन आले का. गंगेत स्नान केलं म्हणजे कुणी अमरपट्टा घेऊन आलेलं नसतं. कधी ना कधी जातीलच ना, असे म्हणत राऊत यांनी अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुंभमेळ्यातील शाही स्नानावर टीकास्त्र सोडलं.