AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काहींनी ‘मातोश्री’वर दहा खोके पोहोचवले अन् त्यांचा पत्ता कट झाला, शिंदे गटाच्या आमदाराचे गंभीर आरोप

बुलढाण्यातील काहींनी मातोश्रीवर दहा खोके पोहोचवले आणि त्यांचा पत्ता कट झाला, असा गंभीर आरोप बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवाराने केला आहे.

काहींनी 'मातोश्री'वर दहा खोके पोहोचवले अन् त्यांचा पत्ता कट झाला, शिंदे गटाच्या आमदाराचे गंभीर आरोप
| Updated on: Nov 08, 2024 | 3:04 PM
Share

MLA Sanjay Gaikwad Allegation : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर सध्या सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता शिंदे गटाचे विद्यमान आमदार आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराने ठाकरे गटावर मोठा आरोप केला आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा ए.बी.फॉर्म तयार होता. मात्र बुलढाण्यातील काहींनी मातोश्री वर दहा खोके पोहोचवले आणि त्यांचा पत्ता कट झाला, असा गंभीर आरोप बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड यांनी केला आहे. यावेळी त्यांनी महाविकासआघाडीतील बुलढाण्याचे उमेदवार जयश्री शेळके यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

संजय गायकवाड काय म्हणाले?

“शेतकरी नेते रविकांत तुपकर हे मातोश्रीवर गेले होते. त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. त्यांना ती उमेदवारीदेखील मिळत होती. त्यांच्यासाठी एबी फॉर्मही तयार ठेवण्यात आला होता. मात्र रात्री अचानक बुलढाण्यातील काही लोक मातोश्रीवर दहा खोके घेऊन गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रविकांत तुपकर यांचा पत्ता कट झाला…”, असा गंभीर आरोप बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड यांनी प्रचार सभेदरम्यान केला.

संजय गायकवाड यांनी महाविकासआघाडीच्या बुलढाण्याच्या उमेदवार असलेल्या जयश्री शेळके यांचे पती सुनील शेळके यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. “नोटाबंदीच्या काळात मुंबईच्या लोकांनी जयश्री शेळके यांच्या राजश्री शाहू बँकेत नोटा बदलविण्यासाठी एक हजार कोटी रुपये जमा केले होते. मात्र यांनी 500 कोटी वर पाठवले. त्यावेळेस सुनील शेळके हे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांनी त्यानंतर नोकरी सोडून दिली. आजकालच्या मुलांना नोकरी मिळत नाही, मात्र उपजिल्हाधिकारी पदावरचा माणूस नोकरी सोडूच कशी शकतो?” असा सवालही संजय गायकवाड यांनी केला. दरम्यान संजय गायकवाड यांच्या आरोपामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बुलढाण्यात अटीतटीची लढाई

बुलढाणा जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत. यात 2019 मध्ये इथे काँग्रेसचे 1, शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस 1, भाजपचे 3 आमदार निवडून होते. यात बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून संजय गायकवाड यांना तिकीट मिळाले आहे. तर त्यांच्याविरुद्ध ठाकरे गटाच्या जयश्री शेळके या रिंगणात उतरल्या आहेत. यामुळे बुलढाण्यात अटीतटीची लढाई होणार आहे.

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.