AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंसोबत युती करण्याबद्दल उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी हिंट, म्हणाले राज्याच्या मनात…

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी संभाव्य युतीबाबत सूचक विधान केले. त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आणि १९९२-९३च्या मुंबई दंगलीचा उल्लेख करून भाजपच्या भूमिकेवर टीका केली.

राज ठाकरेंसोबत युती करण्याबद्दल उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी हिंट, म्हणाले राज्याच्या मनात...
| Updated on: Jun 19, 2025 | 10:10 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दलच्या चर्चांनी जोर धरला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येतील अशा बातम्या सातत्याने येत आहेत. ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या चर्चांवर आता उद्धव ठाकरे यांनी थेट भाष्य केले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) च्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये झालेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीबद्दल सूचक विधान केले. “बातम्या सुरू आहेत. काय होणार? कसलं? होणार का? होणार की नाही होणार, कळेल ना. राज्याच्या मनात आहे तेच मी करणार आहे.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आमचं आम्ही पाहू

“पण ते होऊ नये, मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर गाठीभेटी घेऊ लागले. हॉटेलात भेटतात. मालकाचे नोकर तुम्ही, जर का मुंबईवर ताबा मिळाली नाही. मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आली . अरे आम्ही घेणारच आहोत. मराठी माणसाच्या ताब्यात मुंबई गेली तर मालकाचं कसं होणार. मालकाच्या मित्राचं कसं होणार म्हणून मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये. म्हणून शेठजीचे नोकर,. आणि नालायकपणे वर्धापन दिन साजरा करणारे शेठजीच्या नोकरांचे नोकर आहेत. तुला काय करायचं तुला नाही होत आमचं आम्ही पाहू”, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

भाजपचं नामोनिशाण मिटवून टाकू

उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपवर थेट हल्ला चढवला. “काय करायचं ते. जर तुम्हाला वाटत असेल तर शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल, तर तुमचं नामोनिशाण महाराष्ट्राच्या धर्तीवरून मिटवून टाकल्याशिवाय राहणार नाही. भाजपचं नामोनिशाण मिटवून टाकू. आज तर मी तयारीने उभा आहे.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई दंगलीची आठवण

यावेळी उद्धव ठाकरेंनी १९९२-९३ च्या मुंबई दंगलीची आठवण करून देताना एक किस्सा सांगितला. “९२-९३ साली जेव्हा दंगा भडकला होता, तेव्हा तुम्हीच रस्त्यावर उतरला होता. तेव्हा एक व्यक्ती बाळासाहेबांकडे आली होती. बाळासाहेब आता बस्स झालं. पुरे झालं. ती व्यक्ती कोण सांगणार नाही. ते हयात आहेत,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow Us
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम