AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेला पहिलं यश, धुळ्यातील ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला

शिंदखेडा तालुक्यातील वडदे ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा भगवा फडकवण्यात शिवसेनेला यश आलं आहे. (Shivsena win Wadade Gram Panchayat unopposed)

शिवसेनेला पहिलं यश, धुळ्यातील ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला
वडदे ग्रामपंचायतीचं बिनविरोध निवड झालेले प्रतिनिधी
| Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 8:07 PM
Share

धुळे: राज्यात 14 हजार 232 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक (Gram Pachayat Election)प्रक्रिया सुरु आहे. मात्र, धुळे जिल्ह्यातून शिवसेनेसाठी (Shivsena) आनंदाची बातमी समोर आली आहे. धुळे जिल्ह्यातील वडदे ही पहिली ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. शिंदखेडा तालुक्यातील वडदे ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा भगवा फडकवण्यात शिवसैनिकांना आलं आहे. वडदे गावानं ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून 45 वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे. (Shivsena won Wadade Gram Panchayat unopposed)

राज्यातील सत्ताधारी शिवसेनेला ग्रामपंचायत निवडणुकीत पहिलं यश मिळालं आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा मधील वडदे ग्रामपंचायत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे आणि जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई सोनवणे यांच्या नेतृत्तावत बिनविरोध झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाची प्रेरणा घेऊन ग्रामपंचात निवडणूक बिनविरोध केल्याचं शानाभाऊ सोनवणे यांनी सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाच्या प्रेरणा घेत शिवसैनिकांनी ग्रामपंचायत बिनविरोध केली. उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा तालुक्यातील वडदे ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आली. सीमा देवेसिंग भिल, कविता दिनेश चित्ते, शुभांगी सुनिल चित्ते, माधुरी किशोर कोळी, राजेंद्र बन्सिलाल मगरे, विजय अशोक चित्ते, प्रवीण किसन चित्ते यांची ग्रामपंचायतीवर बिनविरोध निवड झाली. शिवसेनेचा भगवा फडकवून गेल्या ४५ वर्षाची परंपरा वडदे गावकऱ्यांनी कायम ठेवली.

शिंदखेडा शहर प्रमुख सागर देसले व माजी शहर प्रमुख नंदकिशोर पाटील यांच्यासह वडदे गावातील गावकऱ्यांनी एकत्र येऊन वडदे गावाचा नावलौकिक शिंदखेडा तालुक्यात वाढवला आहे. वडदे येथील गावकऱ्यांनी शिंदखेडा तालुक्यात एक आदर्श निर्माण केला.

अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही गोंधळात गोंधळ सुरू आहे. तब्बल दोन तास महा ऑनलाईन सर्व्हर ठप्प झाल्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा एकच बोजवारा उडाला. त्यामुळे इच्छुकांनी ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी धाव घेतल्याने तहसील कार्यालयाबाहेर एकच गर्दी झाली असून अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला आहे.

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. गेल्या चार पाच दिवसांपासून ऑनलाईन अर्ज भरण्याचा गोंधळ सुरू असल्याने निवडणूक आयोगाने ऑफलाईन फॉर्म भरण्याचीही मुभा दिली आहे.

संबंधित बातम्या:

मुदतबाह्य 1566 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली, तर 12,668 ग्रामपंचायत निवडणुकांना स्थगिती

तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

गावची निवडणूक बिनविरोध करा, 25 लाखांचा निधी मिळवा; आमदार निलेश लंकेंची ऑफर

(Shivsena won Wadade Gram Panchayat unopposed)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.