AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेढा, साप, नरबळी, रिव्हॉल्व्हरवर राजमुद्रा; अशोक खरातबाबत वकिलांची कोर्टात भयानक माहिती

लिंगपिसाट अशोक खरातची आज आज पोलीस कोठडीची मुदत संपली होती. त्यानंतर त्याला नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात नेमकं काय घडलं जाणून घ्या...

पेढा, साप, नरबळी, रिव्हॉल्व्हरवर राजमुद्रा; अशोक खरातबाबत वकिलांची कोर्टात भयानक माहिती
अशोक खरातImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 24, 2026 | 4:55 PM
Share

महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित ज्योतिषी ‘कॅप्टन’ अशोक खरातला आज (२४ मार्च) नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची मागील पोलीस कोठडीची मुदत आज संपली होती. दुपारी ३.५० वाजता खरातला न्यायालयात आणण्यात आले. पोलिसांनी पुढील तपासासाठी कोठडीची मागणी केली. न्यायालयाने अशोक खरातला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तो आता २९ मार्चपर्यंत पोलिसांच्या ताब्यात राहील. दरम्यान, न्यायालयात सरकारी वकीलांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. त्यामध्ये अशोक खरातच्या घरात सापडलेल्या रिव्हॉल्व्हरवर राजमुद्रा असल्याचे समोर आले आहे. तसेच त्याने पाच नरबळी दिल्याचा दावा वकिलांनी केला आहे.

न्यायालयात काय घडले?

-खरात येण्यापूर्वीच कोर्टरूममध्ये वकिलांची मोठी गर्दी झाली होती.

-सरकारी वकील अजय मिसर (एसआयटीकडून) कोर्टात हजर झाले.

-आरोपीचा पुकारा झाल्यानंतर सुमारे १७ मिनिटांनी खरातला न्यायालयात आणण्यात आले.

-खरातला तोंडावर काळा कपडा बांधून पोलिसांच्या कडक बंदोबस्तात आणले होते. आरोपीच्या सुरक्षेच्या कारणास्तव न्यायाधीशांनी त्याला कोर्टरूमच्या बाजूला उभे करण्याचे आदेश दिले.

-सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई देखील कोर्टात उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, “मला संधी मिळाली तर मी खरातच्या कानाखाली मारेन.”

सरकारी वकील अजय मिसर यांनी सादर केलेले मुद्दे

-अशोक खरात स्वतःला ‘सिद्ध पुरुष’ आणि ‘कॉस्मोलॉजी’चा अभ्यासक म्हणवत होता. त्याच्याकडे काही प्रमाणपत्रे मिळाली आहेत.

-त्याच्या ताब्यातून ६ लाख ५३ हजार रुपये रोख, लॅपटॉप आणि काळ्या रंगाचे रिव्हॉल्व्हर (त्यावर राजमुद्रा असलेले) जप्त करण्यात आले.

-रिव्हॉल्व्हरमध्ये ३१ काडतुसे आढळली, त्यातील ५ काडतुस फायर झालेल्या आहेत. हे फायर कुठे केले? नरबळी दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

-फार्महाऊसमध्ये ५ रिकाम्या पिस्तुलाच्या गोळ्या सापडल्या आहेत. त्यांचा शोध घेतला जाणार.

-खरात ६७ वर्षांचा असून, तो ३० वर्षांच्या तरुणींसोबत लैंगिक शोषण करत होता, यावरून त्याची विकृत मानसिकता स्पष्ट होते.

-तो वाघ, साप, नाग दाखवत होता. ते जिवंत होते की नकली? याचा तपास सुरू आहे.

-हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी दिल्याचा दावा करत तो फसवणूक करायचा. हरणाची हत्या केल्याचा संशय आहे.

-वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत (Forest Act) गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

-प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने ७ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकीलांनी केली.

अशोक खरातचे वकील काय म्हणाले?

-यापूर्वी ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

-हा गुन्हा सेक्स, फसवणूक आणि मालमत्ता संबंधित आहे.

कोर्टात खरातचे वर्तन

-युक्तिवाद सुरू असताना अशोक खरात मान खाली घालून उभा होता आणि आपले बोट बघत होता.

-न्यायाधीशांनी त्याला विचारले, “काही बोलायचे आहे का?”

-त्यावर खरात म्हणाला, “मला साप, वाघ याविषयी काही माहिती नाही.”

-न्यायालयाने दोन्ही बाजूंचा विचार करून ५ दिवसांची (२९ मार्चपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली.

Follow Us
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!
उद्धव ठाकरेंना जबर धक्का, कोणतंही कारण न सांगता जिल्हाप्रमुखाने थेट...
Big Breaking | उद्धव ठाकरेंना जबर धक्का, कोणतंही कारण न सांगता जिल्हाप्रमुखाने थेट....कोल्हापुरात नेमकं काय घडलं?
भोंदू खरात प्रकरणी मोठी अपडेट; कल्पना खरातचा जामीन अर्ज मंजूर, कारण...
भोंदू खरात प्रकरणी मोठी अपडेट; कल्पना खरातचा जामीन अर्ज मंजूर, कारण...
ही भाषा तुमचं राजकारण संपवेल; संजय पाटलांना आव्हाडांचा थेट इशारा
Jitendra Awhad | ही भाषा तुमचं राजकारण संपवेल; संजय दिना पाटलांना जितेंद्र आव्हाडांचा थेट इशारा
उगाचंच माझ्या XXX... हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलां
उगाचंच माझ्या XXX... हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलांचं थेट पोलीस आयुक्तांना आव्हान
राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच
Sanjay Dina Patil | राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच मग्रुरीची भाषा