AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उघडकीस आला असून, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने काँग्रेसचे नेते भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस
bhai jagtapImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Jan 17, 2026 | 8:38 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, आता पुन्हा एकदा काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) मुंबईतील काँग्रेस नेते व विधानपरिषदेचे सदस्य भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची सार्वजनिक मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यू. बी. वेंकटेश यांनी 17  जानेवारी 2026 रोजी जारी केलेल्या नोटीसमध्ये, भाई जगताप यांनी माध्यमांमध्ये केलेली वक्तव्ये पक्षशिस्तीचे उल्लंघन असल्याचे नमूद केले आहे.  पक्षातील संघटनात्मक बाबी, नेतृत्व व मतभेद सार्वजनिक मंचावर मांडणे चुकीचे असून ते अंतर्गत व्यासपीठावरच मांडणे अपेक्षित असल्याचे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

अशा वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होते, गोंधळ निर्माण होतो आणि संघटनात्मक एकतेला धक्का बसतो, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांत लेखी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले असून, समाधानकारक उत्तर न दिल्यास शिस्तभंगाची पुढील कारवाई केली जाईल, असा इशाराही या पत्राद्वारे भाई जगताप यांना देण्यात आला आहे. त्यामुळे आता भाई जगताप यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून,  भाई जगताप हे या नोटीसला काय उत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काँग्रेसमधील अंतर्गत वाद उघड 

शुक्रवारी राज्यातील महापालिका निवडणुकीचे निकाल लागले या निवडणुकीमध्ये काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे. लातूरमध्ये तर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं. तर मुंबईमध्ये देखील तब्बल 24 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. मात्र एकीकडे पक्षानं महापालिका निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे, तर दुसरीकडे मात्र आता काँग्रेसमधील अंतर्गत वाद उघड झाला असून, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची सार्वजनिक मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे, आता या पत्राला भाई जगताप काय उत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...