AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New Education Minister : फडणवीस नव्हे तर शिंदे गटाचा हा बाहुबली नेता देशाचा नवा शिक्षणमंत्री? 3 नावं चर्चेत!

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले होते. त्यांची पक्षातील वरिष्ठांशी काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही.

New Education Minister : फडणवीस नव्हे तर शिंदे गटाचा हा बाहुबली नेता देशाचा नवा शिक्षणमंत्री? 3 नावं चर्चेत!
narendra modi and educaion ministryImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 25, 2026 | 8:27 PM
Share

New Education Minister : धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन तसेच विरोधकांचा वाढता दबाव लक्षात घेता त्यांना मंत्रिपदाची खुर्ची खाली करावी लागली. दरम्यान, हा राजीनामा म्हणजे भाजपाला मोठा धक्का आणि विरोधकांसाठी राजकारणात मुसंडी मारण्यासाठी योग्य संधी असल्याचे बोलले जात आहे. या राजीनाम्यामुळे भविष्यातील राजकीय डावपेच बदलणार आहेत. दुसरीकडे प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची जागा कोण घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकूण पाच नेत्यांची नावे समोर आली आहेत.

फडणवीसांची दिल्लीवारी

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले होते. त्यांची पक्षातील वरिष्ठांशी काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु गेल्या काही महिन्यांपासून ते लवकरच दिल्लीच्या राजकारणात सक्रीय होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते आगामी केंद्रीय शिक्षणमंत्री होऊ शकतात, असे बोलले जात आहे.

जयंत चौधरी यांचेही नाव चर्चेत

केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाच्या शर्यतीत दुसरे नाव म्हणजे जयंत चौधरी. राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) चे अध्यक्ष आहेत. 2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीआधी ते एनडीएत सहभागी झाले होते. ते सद्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आहेत. शिक्षण राज्यमंत्री म्हणूनही कार्यरत आहेत.

शिंदे गटातील या नेत्याची चर्चा

इंडिया टिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे हेदेखील केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. ते डॉक्टर आहेत. सोबतच ते 2014 सालापासून खासदार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मिळणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांचेही नाव या मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.

प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार

दरम्यान, केंद्रीय शिक्षणंत्रिपदाची पूर्ण जबाबदारी कोणावर सोपवली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या फक्त वेगवेगळ्या नावांची चर्चा आहे. सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु सध्यातरी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?
KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
KDMC Doctor Marhan Case | KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
Washim Soyabean Farmer Issue | वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole On OBC | ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप; राज्यपालांच्या भेटीनंतर राजकारण तापलं
दिशा सालियान प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया
दिशा सालियान प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया