AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लातूरच्या लेकीचा सलग 24 तास लावणी करण्याचा निर्णय, 26 जानेवारीला घडवणार इतिहास

लातूरची सृष्टी जगताप ही मुलगी 26 जानेवारी रोजी 24 तास लावणी नृत्य सादर करून आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नावं नोंदवायला निघाली आहे.

लातूरच्या लेकीचा सलग 24 तास लावणी करण्याचा निर्णय, 26 जानेवारीला घडवणार इतिहास
| Edited By: | Updated on: Jan 25, 2021 | 7:13 AM
Share

लातूर : हल्लीची मुलं आपल्या कलागुणांना वाव देण्याची एकही संधी सोडत नाहीत. याचंच एक उत्तम उदाहरण लातूरमधून समोर आलं आहे. लातूरची सृष्टी जगताप ही आपल्या कलेला उच्च पातळीवर नेण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. आता तिने आपली कला थेट आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्याचा निश्चय केला आहे. यासाठी तिने जे करणार आहे, ते वाचून तुम्हालाही धक्का बसेल. (Shrishti Jagtap from Latur will register her name in Asia Book of Records by performing 24 hour dance on January 26)

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरची सृष्टी जगताप ही मुलगी 26 जानेवारी रोजी 24 तास लावणी नृत्य सादर करून आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नावं नोंदवायला निघाली आहे. सृष्टी गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे नृत्य प्रकार सादर करत असते. त्यामुळे आता आपली कला संपूर्ण जगासमोर आणण्यासाठी ती सध्या प्रयत्न करत आहे. त्यामुळेच तिने 24 तास लावणी सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.

खरंतर, 24 तास सतत नाचणं म्हणजे शरीराची मोठी कसरत आहे. त्यात लावणीसारख्या मराठमोळ्या नृत्यप्रकारामध्ये खूप ताकद आणि मेहनतीची आवश्यकता आहे. पण सृष्टी आपल्या कलेतून या सगळ्यावर विजय मिळणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. तिच्या या निर्णयाला आणि आत्मविश्वासाला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे सृष्टीला यश मिळो अशीच प्राथर्ना तिथे कुटुंबीय आणि गावातील मंडळी करत आहेत.

अधिक माहितीनुसार, सृष्टीने अनेक स्पर्धांमधून पारितोषिकं पटकावलेली आहेत. देशात आणि देशाबाहेरही सृष्टीने लावणीचे सादरीकरण केलेलं आहे. मात्र, सध्या तिचं लक्ष आशिया रेकॉर्ड बुकवर केंद्रित आहे. 26 जानेवारीला सकाळी ती सलग लावणी नृत्याचं रेकॉर्ड करण्यासाठी नृत्याला सुरुवात करणार आहे. 24 तास नृत्य सादर करण्याचा तिचा मनोदय आहे. यासाठी तिला बळ मिळो हीच प्राथर्ना! (Shrishti Jagtap from Latur will register her name in Asia Book of Records by performing 24 hour dance on January 26)

संबंधित बातम्या – 

भावा कडक! नागपूरचा चहावाला जॉनी डेप सोशल मीडियावर चमकला

VIDEO: पावसात भिजत होती कोंबडीची पिल्लं, आईने असं काही केलं की तुम्ही विचारही नाही करू शकत

गावानं नाकारलं, देश स्वीकारणार, बारा मतदारांचे जाहीर आभार, लातूरच्या पठ्ठ्याचं बॅनर

(Shrishti Jagtap from Latur will register her name in Asia Book of Records by performing 24 hour dance on January 26)

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.