आपला तो बाबू आणि दुसऱ्याचं ते कारटं…; उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराचा नारायण राणेंवर हल्लाबोल

Vaibhav Naik on Narayan Rane : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान टीका टिपण्णी केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी नेमकं काय म्हटलंय? वाचा सविस्तर...

आपला तो बाबू आणि दुसऱ्याचं ते कारटं...; उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराचा नारायण राणेंवर हल्लाबोल
नारायण राणे, भाजप नेतेImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 12:13 PM

विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार आता सुरु झाला आहे. सिंधुदुर्गमधील कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वैभव नाईक यांनी राणे कुटुंबावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर वैभव नाईकांनी टीकास्त्र डागलं आहे. निलेश राणे हा नारायण राणेंचा मुलगा आहे. त्यामुळे त्यांना सरस वाटतोय. खासदार असताना त्यांच्या मुलाने काय दिवे लावले? दुसऱ्याचं ते कारटं आणि आपला तो बाबू अशी राणेंना नेहमीच सवय आहे, असं वैभव नाईक म्हणाले. कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघात वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे अशी लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

वैभव नाईक काय म्हणाले?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना उद्धव ठाकरे यांच्याबाबत आत्मियता आहे. याला येऊ देणार नाही त्याला येऊ देणार नाही. हीच राणेंची प्रवृत्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. तेव्हा राणेंचे तोंड धरले होते काय? राणेंना लाज वाटायला पाहिजे. आपण एका पक्षात, मुलगा दुसऱ्या पक्षात, दुसरा मुलगा दुसऱ्या पक्षात आहे. राणे हे आता आपल्या परिवारा पुरतेच असल्याने त्यांना उद्धव ठाकरेंवर बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही, असं वैभव नाईक म्हणालेत.

नारायण राणेंच्या मागे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता आता राहणार नाही. राणेंचे चॅलेंज आम्ही वारंवार स्वीकारलं आहे. राजकोट किल्ल्यावरून आदित्य ठाकरेंना बाहेर न येऊ द्यायचे चॅलेंज स्वीकारलं होतं. राणे आता वैफल्यग्रस्त झाले आहेत. कारण घराणेशाही विरोधात सिंधुदुर्गातील जनतेचा आता उद्रेक झाला आहे. राणेंचे चॅलेंज आम्ही कायम स्वीकारत असतो आणि उद्या ही स्वीकारू…, असं खुलं आव्हान वैभव नाईक यांनी राणेंना दिलं आहे.

मी काहीतरी काम केलंय म्हणूनच तुम्हाला दारोदारी फिरावं लागतंय. सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व मी करतोय. त्यामुळे माझाच विजय होणार आहे. कोरोना काळात तुम्ही कुठे होता? येणाऱ्या निवडणुकांनंतर शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, एवढं निश्चित आहे. कुडाळ- मालवण या विधानसभा मतदारसंघातून मी दोनवेळा निवडून आलोय. यावेळी देखील माझाच विजय निश्चित आहे, असा विश्वासही वैभव नाईकांनी व्यक्त केला आहे.

बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट
बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट.
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य.
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ.
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले...
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले....
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय.
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख.
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ.
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा.
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ.
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात..
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात...