LIVE : राज ठाकरे आणि अण्णांची बंद दाराआड चर्चा

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : केंद्रात लोकपाल नियुक्त करावा, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण सुरु केले असून, आज या उपोषणाचा सहावा दिवस आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका अण्णांनी घेतली आहे. शिवाय, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर येत्या 8 किंवा 9 फेब्रुवारीला ‘पद्मभूषण’ पुरस्कार परत करेन, […]

LIVE : राज ठाकरे आणि अण्णांची बंद दाराआड चर्चा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:30 PM

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : केंद्रात लोकपाल नियुक्त करावा, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण सुरु केले असून, आज या उपोषणाचा सहावा दिवस आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका अण्णांनी घेतली आहे. शिवाय, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर येत्या 8 किंवा 9 फेब्रुवारीला ‘पद्मभूषण’ पुरस्कार परत करेन, असा इशाराही अण्णांनी दिला आहे.

LIVE UPDATE :

  • अण्णांशी भेटीनंतर राज ठाकरेंचं भाषण, पाहा व्हिडीओ :

  • या (सत्ताधारी) नालायकांसाठी जीवाची बाजी लावू नका, असं मी अण्णांना सांगितलं – राज ठाकरे
  • अण्णांशी चर्चेनंतर राज ठाकरे माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता
  • अण्णा आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा व्हिडीओ :

  • राज ठाकरे आणि अण्णा हजारे यांची बंद दाराआड चर्चा सुरु
  • अण्णा हजारेंच्या भेटीसाठी राज ठाकरे उपोषणस्थळी दाखल

आज राज ठाकरे भेटणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कालच राळेगणसिद्धीला गेले आहेत. आज सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे अण्णा हजारेंची भेट घेतील. अण्णांच्या भेटीनंतर राज ठाकरे नेमकी काय भूमिका जाहीर करतात, याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

…तर ‘पद्मभूषण’ परत करेन : अण्णा

केंद्रात लोकपाल नियुक्त करावं. जर सरकारने माझ्या मागण्यांवर विचार केला नाही, तर 8 किंवा 9 फेब्रुवारीला ‘पद्मभूषण’ पुरस्कार परत करेन, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारला दिला आहे.

सरकारकडून गिरीश महाजन अण्णांच्या भेटीला

अण्णांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी सरकारला जाग आली आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीमध्ये काल (3 फेब्रुवारी) दाखल झाले. त्यांनी बंद दाराआड अण्णांशी चर्चा केली. मात्र, या चर्चेला काही यश आल्याचं चित्र नाही. कारण उपोषण सुरुच ठेवण्याची घोषणा यावेळी अण्णांनी केली.

गिरीश महाजनांच्या भेटीत काय झालं?

अणांना भेटल्यानंतर, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर, गिरीश महाजन यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास बातचित केली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली, असे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले. महाजनांनी अण्णांचं मुख्यमंत्र्यांशीही फोनवरुन बोलणं करुन दिलं. “अण्णांच्या तब्येतीची आम्हालाही काळजी आहे. त्यांच्या बहुतांश मागण्या आम्हाला मान्य आहेत. किंबहुना, अण्णांचे बहुतांश प्रश्न मार्गी लागलेत”, असेही महाजन यांनी अण्णांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

अण्णांचं उपोषण नेमकं कशासाठी सुरुय?

केंद्रात लोकपाल नियुक्तीसाठी अण्णा हजारे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आणि अण्णांनी त्यांचं गाव राळेगणसिद्धीतून या उपोषणाला बुधवारी 30 जानेवारीपासून सुरुवात केली. अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलनानंतर2013 साली तत्कालीन यूपीए सरकारने लोकपाल कायदा मंजूर केला. पण त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत झालेली नाही. केंद्र सरकारकडून लोकपालच्या नियुक्तीसाठी पॅनलची नियुक्ती करण्यात आली आहे. या पॅनलकडून लोकपाल कुणाला नियुक्त करायचं त्याबाबत शिफारस करण्यात येईल आणि त्यानंतर पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, सरन्यायाधीश (किंवा सरन्यायाधीशांनी नियुक्त केलेले न्यायमूर्ती) आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेता यांच्या उच्चस्तरीय समितीकडून लोकपालची नियुक्ती केली जाईल.

लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा आणि शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव या मागण्यांसाठी अण्णा त्यांच्या राळेगणसिद्धी या गावात आंदोलन करत आहेत.

जनलोकपालची वैशिष्ट्ये काय?

राज्य स्तरावर लोकायुक्त, तर केंद्रात लोकपाल असेल

सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग याप्रमाणेच ही स्वायत्त संस्था असेल, ज्यात कुणीही मंत्री किंवा अधिकारी हस्तक्षेप करु शकत नाही.

भ्रष्टाचाराची प्रकरणे प्रलंबित राहू नयेत यासाठी तरतूद आहे. जास्तीत जास्त एका वर्षात चौकशी आणि त्यापुढील जास्तीत जास्त एका वर्षात सुनावणी अशी प्रक्रिया असेल. म्हणजे एकूण दोन वर्षांच्या आत भ्रष्टाचार प्रकरणाचा निपटारा होईल.

भ्रष्ट व्यक्तीमुळे सरकारला जे नुकसान झालंय, ते शिक्षा सुनावतानाच भरुन घेतलं जाईल.

कुठे निधीचा दुरुपयोग केल्याचं दिसलं, रेशन कार्ड मिळालं नाही, पासपोर्ट संबंधी तक्रार असेल, पोलीस तक्रार घेत नसतील,खराब दर्जाचा रस्ता बनवला असेल अशा विविध प्रकरणांची तक्रार लोकपाल किंवा लोकायुक्तांकडे करता येईल.

योग्य व्यक्तीची लोकपाल म्हणून नेमणूक व्हावी यासाठी नियुक्ती थेट सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींकडून होईल. या प्रक्रियेत अत्यंत पारदर्शीपणा ठेवण्याची तरतूद कायद्यात आहे.

केंद्रीय दक्षता आयोग आणि सीबीआय यांसारख्या संस्थाही लोकपालच्या कक्षेत येतील.

भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्यांना संरक्षण देणं लोकपालची जबाबदारी असेल.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.