AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सियाचा बॉयफ्रेंडसोबत लग्नाचा हट्ट, कुटुंबियांनी दिला फक्त या कारणामुळे नकार, मोठा खुलासा..

Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठा खुलासा झाला असून सिया गोयल हिच्या कुटुंबियांनी प्रियकर चेतन चाैधरी याच्यासोबतच्या लग्नासाठी नकार देण्याचे कारण पुढे आले. सियाने चेतन याच्यासोबत लग्न करण्यासाठी हट्ट धरला होता.

सियाचा बॉयफ्रेंडसोबत लग्नाचा हट्ट, कुटुंबियांनी दिला फक्त या कारणामुळे नकार, मोठा खुलासा..
Ketan Agarwal Case
| Updated on: Jun 25, 2026 | 11:00 AM
Share

पु्ण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याचा 400 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला, असे सांगण्यात आले. होणारी पत्नी सिया गोयल हिच्यासोबत तो लोहगडावर फिरण्यासाठी गेला होता. मात्र, त्यानंतर पोलिस तपासात जी माहिती पुढे आली, ज्याने एकच खळबळ उडाली. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चाैधरी यांनी त्याला धक्का मारून दरीत ढकलून दिले. या प्रकरणात एका मागून एक धक्कादायक माहिती पुढे येताना दिसत आहे. 20 वर्षीय सिया गोयल हिची ओळख मार्केटयार्ड परिसरातील क्रिकेटर असलेल्या 23 वर्षीय चेतन चाैधरी याच्यासोबत झाली. याच परिसरात सिया गोयल हिचा बेकरीचा व्यवसाय होता. सिया आणि चेतन यांच्यातील मैत्री प्रेमात रूपांतरीत झाली. त्यानंतर सिया हिने तिच्या कुटुंबियांकडे चेतन याच्यासोबतच्या लग्नासाठी हट्ट धरला.

चेतन याच्या कुटुंबियांचा ड्रायफ्रूट्स व्यवसाय असला तरीही, सियाच्या तुलनेत चेतन यांची आर्थिक स्थिती तेवढी चांगली नव्हती. सियाच्या वडिलांचा मार्केटयार्डमध्येच ड्रायफ्रूट्स आणि मसाल्यांचा मोठा व्यवसाय आहे. त्यांच्या तुलनेत चेतन चाैधरी गरीब होता. चेतनचे वडील बाबूराव चाैधरी यांचा ड्रायफ्रूट्सचा व्यवसाय होता. मात्र, त्या सियाच्या तुलनेत ते गरीब होते. आपली लेक गरीबाच्या नाही तर बलाढ्य श्रीमंताच्या घरी देण्यालाठी लेकीन हट्ट करूनही सिया गोयल हिच्या कुटुंबियांनी सियाचे लग्न युएसवरून शिक्षण पूर्ण करून आलेल्या केतन याच्यासोबत जुळवले.

कारण केतन वडिलांच्यासोबतच बांधकाम व्यवसायात उतरला होता. त्याने स्वत:ची साईटही सुरू केली होती. फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला तर नोव्हेंबर महिन्यात उदयपूर येथे शाही पद्धतीने महालमध्ये लग्न होते. कोट्यावधी रूपये खर्च करून हा महाल अग्रवाल कुटुंबाकडून बुक करण्यात आला होता. जर साखरपुडा झाल्यानंतर पळून गेले तर खानदानाचे नाव खराब होईल, म्हणून सियाने पळून न जाण्याचा निर्णय घेतला.

आपली आणि आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी सियाने थेट केतनला संपवण्याचा कट रचला. मात्र, सिया ज्यावेळी केतनच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली, त्यावेळी केतनच्या बहिणीला तिच्यावर संशय आला. त्यादिवशी लोहगडावर नक्की काय काय घडले, याबाबत तिने सियाला प्रश्न विचारले. तिथेच सियाची खरी गडबड झाली. केतनच्या बहिणीच्या प्रश्नांना तिला उत्तर देता आले नाही. तिथेच सिया फसली.

Follow Us
शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल...
शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल, पण... नेमकं काय म्हणाले बाबासाहेब पाटील?
मोठी खळबळ! ठाकरे गटाचा मोठा डाव; सहा फुटीर खासदारांच्या अडचणी पुन्हा..
मोठी खळबळ! ठाकरे गटाचा मोठा डाव; सहा फुटीर खासदारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या?
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळेंची खासदारांसह पंतप्रधानांच्या भेट
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळे खासदारांसह पंतप्रधानांच्या भेटीसाठी दाखल; व्हिडीओ आला समोर
बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही...
Chandrashekhar Bawankule | कुणबी प्रमाणपत्रावरून मोठा ट्विस्ट! बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही; अधिकाऱ्याचं पत्र आलं समोर
अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
Manoj Jarange VS Chandrashekhar Bawankule | अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम; बावनकुळेंवरही जोरदार हल्लाबोल
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं थेट विधान
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं सूचक विधान, म्हणाले...
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायमूर्तींची अचानक बदली, नेमकं काय घडलं?
आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा! आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक
MNS Meeting | राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक; मनसेत मोठे फेरबदल होणार?
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाले, शुद्ध....
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाला, शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या...