तर 1500 रुपये परत घेईन, लाडकी बहीण योजनेवर या नेत्याचं वक्तव्य चर्चेत
महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी गावागावात महिलांची मोठी गदी पाहायला मिळत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी महिलांना App देखील लॉन्च केले आहे. पण या योजनेवरुन एका आमदाराने एक वक्तव्य केले आहे जे चर्चेत आहे.

आमदार रवी राणा यांचे एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. हे वक्तव्य त्यांना लाडकी बहीण योजनेबाबत केले आहे. रवी राणा म्हणाले की, दिवाळीनंतर निवडणुका होणार आहे. या निवडणुकीत तुम्ही जर आम्हाला भरभरुन आशिर्वाद दिले तर या १५०० रुपयाचे ३००० रुपये होतील. पण जर दिले नाही तर मी पण तुमचा भाऊ आहे. हे १५०० रुपये परत घेईन. रवी राणा हे त्यांच्या या वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. पण हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर त्यांनी या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण ही दिले आहे. ते म्हणाले की, बहीण भावाच्या नात्यांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात मी गंमतीने ते बोललो होतो आणि सगळ्या महिला तेव्हा हसत होत्या. बहीण भावाचं नातं हे गमतीचं आपुलकीचं,प्रेमाच, असलं पाहिजे आणि त्या नात्यांमध्ये मी बोललो मात्र विरोधक त्याचा बाऊ करत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे.
सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेची रक्कम पंधराशे रुपये वरून तीन हजार रुपये महिना करण्याची मागाणी सुद्धा मी केली आहे. आशा वर्कर मदतनीस यांचा पगार वाढावा ही सुद्धा मी मागणी केली आहे. विरोधकांनी काही चांगल्या गोष्टी शिकले पाहिजे, बहीण भावाच्या नात्यामधली गोष्ट पकडून विरोधक आपली राजकीय पोळी शेकत आहे. भाऊ बहिणीला देत असतो बहिणीकडून परत घेत नसतो.
सरकार काहीतरी देत आहे. १७ तारखेला पहिल्यांदा महिलांच्या खात्यामध्ये सरकार पैसे टाकणार आहे. खटाखट खटाखट 8500 देण्याचा जो काँग्रेसचा नारा होता, लोकसभेमध्ये खासदार निवडून आणा तुम्हाला खटाखट खटाखट तुमच्या खात्यामध्ये आठ हजार पाचशे रुपये येईल असं सांगितलं. निवडणूक झाल्यानंतर महिलांना काँग्रेसच्या कार्यालयातून हाकललं. खोटं बोलून तुम्ही महिलांचं मतदान घेतलं, पण हे सरकार पहिले देत आहे नंतर मागत आहे.
लाडकी बहीण योजना
राज्यात सध्या माझी लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आहे. सरकारने याची घोषणा केल्यानंतर या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना १५०० रुपये प्रत्येक महिन्याला दिले जाणार आहे. लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
