लग्नात मंगलाष्टक झाली, अक्षता पडल्या; पठ्ठ्याचा 16 वर्षांनी पुन्हा विवाह, नवरीची झलक पाहून सर्वच हादरले
सोलापुरात एका व्यक्तीने प्रतिकात्मक विवाह केला. या पठ्ठ्याने केलेल्या विवाहाची चर्चा संपूर्ण सोलापुरात होत आहे. जाणून घ्या नेमकं काय घडलं?

सोलापुरात एका आगळ्यावेगळ्या विवाहाची जोरदार चर्चा होत आहे. एका पठ्ठ्याने चक्क गाढवीनीशी प्रतिकात्मक विवाह केल्याचे समोर आलं आहे. पत्नी असतानाही या व्यक्तीने गाढवीनीशी प्रतिकात्मक लग्न केलं. त्यामुळे या व्यक्तीची संपूर्ण सोलापुरात चर्चा होत आहे. दीपक सूर्यवंशी असं या व्यक्तीचे नाव आहे. त्याने गाढवीनीशी प्रतिकात्मक विवाह का केला, याचे कारण देखील समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरात बायको परत नांदायला यावी म्हणून पठ्ठ्याने यांनी चक्क ‘गाढवीनी’ सोबत प्रतिकात्मक लग्न केले. 16 वर्षांचा संसार तुटल्याने वैफल्यग्रस्त पीडित पुरुषाने चक्क गाढवीनीसोबत प्रतिकात्मकरित्या विवाह केला. दिपक सूर्यवंशी असं या व्यक्तीचं नाव आहे. पत्नी कुठलीही पूर्वकल्पना न देता निघून गेली, असा दावा दिपक यांनी केला आहे. दिपक सूर्यवंशी यांनी मेव्हणे गणेश साळुंखे आणि मंगळवेढ्यातील माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांच्यावर आरोप केले आहेत. या दोघांनी बायकोला दूर केल्याचा आरोप दीपक यांनी केला आहे.
बायको परत यावी म्हणून…
मागील 15 दिवसांपासून दिपक सूर्यवंशी हे बायको पूजा सूर्यवंशी ही परत यावी म्हणून प्रयत्न करत आहेत. त्यासाठी अखेर त्यांनी सोलापूर जिल्हा परिषद गेट समोर लक्षवेधी धरणे आंदोलन केलेय. मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने त्यांनी आज थेट गाढवीनीसोबत प्रतिकात्मक लग्न करून आगळेवेगळे आंदोलन केले. दरम्यान रितसर मंगलाष्टक पार पडून गाढवीनीच्या गळ्यात पुष्पहार अर्पण करून दिपक सूर्यवंशीने हा प्रतिकात्मक विवाह केला आहे. तत्पूर्वी, काही वर्षांपूर्वी एका तरुणीने स्वत:शी विवाह केला होता. गुजरातच्या क्षमा बिंदूच्या या लग्नाची चर्चा देशभर झाली होती. लोकांच्या विरोधानंतरही तिने स्वत:शी विवाह केला होता. लग्न झाल्यानंतर हनिमूनसाठी गोव्याला गेली होती. तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. आता सोलापुरातील या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. या लग्नानंतर या पठ्ठ्याला ट्रोल करत आहेत. तर काहीजण पत्नीशी झालेला वाद कायदेशीर मार्गाने सोडवण्याची मागणी करत आहे.
