एकनाथ शिंदेंचा भाजपाला सर्वात मोठा दणका, अजितदादांना सोबत घेऊन थेट युतीची घोषणा; मोठी खळबळ!

महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सोलापुरात तर सर्वांनाच धक्का देणारे समीकरण उदयास आले आहे. त्यामुळे सोलापुरात राजकीय गणित बदलले आहे.

एकनाथ शिंदेंचा भाजपाला सर्वात मोठा दणका, अजितदादांना सोबत घेऊन थेट युतीची घोषणा; मोठी खळबळ!
eknath shinde and devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 28, 2025 | 2:37 PM

Solapur Municipal Corporation Election : महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. युती आणि आघाड्यांच्या राजकारणाने जोर धरला आहे. स्थानिक पातळीवरील राजकारण लक्षात घेऊन युती केली जात आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी युतीमध्ये भाजपाला बाहेर ठेवले जात आहे. तर काही ठिकाणी शिंदे गट आणि अजित पवार यांना बाहेर ठेवून युती जन्माला येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. येथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा यांच्यात युती करण्यासाठी चर्चा चालू होती. परंतु आता ऐनवेळी येथे मोठा ट्विस्ट आला आहे. सोलापुरात एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या दोन पक्षांनी युती केली असून भाजपाला धक्का दिला आहे. या नव्या प्रयोगामुळे आता सोलापुरातील विजयाचं गणित बदलणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

नेमकी काय घोषणा झाली?

मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर महापालिकेसाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र आले आहेत. या दोन्ही पक्षांत 51-51 जागांचा फॉर्म्युला ठरला आहे, याबाबत शिंदे गटाचे नेते सिद्धराम म्हेत्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नगरविकास खाते आणि अर्थखाते आमच्या पक्षांच्या नेत्यांकडे आहे. त्यामुळे आम्हाला निधीची कमतरता पडणार नाही. शहर विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे म्हेत्रे म्हणाले.

आम्ही भाजपकडे 40 जागांची मागणी केली होती. त्यांनी आम्हाला ८ जागा देण्यास कबूल केले होते. पण आम्ही 26 जागांवर ठाम होतो.त्यांनी पुढे चर्चा केली नाही, असे म्हणत म्हेत्रे यांनी अजित पवार यांच्यासोबत युती केल्याचे म्हेत्रे यांनी जाहीर केले.

शिंदे गटात होती अस्वस्थता

या युतीसाठी राष्ट्रवादीचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात चर्चा चालू होती. सोलापूर महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये युतीची बोलणी पुढे सरकत नसल्याने शिंदे गट अस्वस्थ होता.

…अन् युतीच्या हालचालींना वेग आला

भाजपा आणि शिवसेनेची युती होत असल्याने अजित पवार गटाने स्वबळावर लढण्याचा नारा दिला होता. मात्र काल (27 डिसेंबर) कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युतीच्या हालचालींना वेग आला आणि युती निश्चित झाली. दरम्यान, आता सोलापुरात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.