Delimitation Bill: मोठा ट्विस्ट! … तर अजितदादांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन बिलावर NDA सोबत जाणार नाही? बड्या नेत्याने टाकला हळूच बॉम्ब, मोठी खळबळ…
Ajit Pawar NCP on Delimitation Bill: राजकीय गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. एकीकडे शरद पवार यांची राष्ट्रवादी मतदारसंघ पुनर्रचना बिलावर पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू असतानाच अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं हळूच एक बॉम्ब टाकला आहे.

संदीप शिंदे , प्रतिनिधी, टीव्ही9 मराठी: सध्या डिलिमिटेशन बिलावरून मोठी फाटाफूट होताना दिसत आहे. त्यावरून राज्यातच नाही तर देशात धुमश्चक्री उडालेली दिसत आहे. दक्षिणेतील राज्यात तर मतदारसंघ पुनर्रचनेवरून मोठं महाभारत सुरू आहे. पण आता रामायण घडण्याची शक्यताही दिसत आहे. राज्याच्या राजकीय गोटातून एक खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने मतदारसंघ पुनर्रचना बिलावर पाठिंबा देण्याची चर्चा रंगलेली असतानाच अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने मात्र हळूच एक बॉम्ब टाकला आहे. त्याने एकच खळबळ उडाली आहे.
तर अजितदादांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन बिलावर NDA सोबत जाणार नाही
विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णासाहेब बनसोडे हे माढ्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे खातरजमा करण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा या वक्तव्याविषयी विचारण्यात आले. तेव्हा ही त्यांनी वक्तव्य मागे घेतले नाही. आण्णासाहेब बनसोडेचं सोलापूरच्या माढ्यात डिलिमिटेशन संदर्भात मोठं वक्तव्य केले आहे.
“राष्ट्रवादी (अजित पवार पक्ष) तर डिलिमिटेशनच्या बाजूने एनडीएसोबत तर जाणार नाही. डिलिमिटेशन संदर्भात अजून बरंच पुला खालून वरून पाणी जाणार आहे. येत्या दोन दिवसांत डिलिमिटेशन संदर्भातील सगळं चित्र स्पष्ट होईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार डिलिमिटेशन विधेयका विषयी जो निर्णय घेतील. त्यांच्या मागे पक्षाचे आमदार -खासदार जातील.” असे विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे नेते आण्णासाहेब बनसोडे यांनी प्रतिक्रिया दिली. पण एनडीसोबत का जाणार नाही, हे मनातील ओठांवर न येऊ देण्याची खबरदारी त्यांनी घेतली.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा निर्णय झालेला नाही
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने NDA सोबत जाण्याचा निर्णय अजून घेतलेला नाही. त्यांनी असे कुठे जाहीर केलेले आहे, असे बनसोडे म्हणाले. तर विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी टीका करणं स्वाभाविक आहे. पण शरद पवारांनी एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, असे आण्णासाहेब बनसोडे म्हणाले. त्यांच्या या विधानाची आता राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. त्यांचा विधानाने संभ्रम वाढला आहे. राजकीय गोटात नेमकं काय घडतंय हे चित्र स्पष्ट व्हायला अजून दोन दिवस लागतील असे बनसोडे यांनी स्पष्ट केलं आहे.