AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur News | एक असंही Baby Shower, शेतकऱ्याकडून लाडक्या ‘सुंदरी’चं डोहाळे जेवण

सोलापुऱ्यातील शेतकऱ्याने केलेल्या अनोख्या कृतीचं राज्यभरात कौतुक होत आहे. शेतकरी आणि मुक्या प्राण्यांचं नातं कसं असतं ते आपल्याला शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. सोलापूरच्या एका शेतकऱ्याने कृतार्थ भावनेतून त्याच्या गायीच्या डोहाळे जेवणाचा अनोखा कार्यक्रम आयोजित केला.

Solapur News | एक असंही Baby Shower, शेतकऱ्याकडून लाडक्या 'सुंदरी'चं डोहाळे जेवण
| Updated on: Oct 02, 2023 | 7:52 PM
Share

सागर सुरवसे, Tv9 मराठी, सोलापूर | 2 ऑक्टोबर 2023 : शेतकऱ्याचं गाय, म्हैस, बैल या गुराढोरांशी अतिशय जिव्हाळ्याचं नातं असतं. मुक्या प्राण्यांना आपण जितका जीव लावतो तितका त्यांना आपला लळा लागतो. मुके प्राणी शेतकऱ्यावर माणसापेक्षाही जास्त प्रेम करतात. याशिवाय शेतकरी देखील आपल्या लाडक्या मुक्या जीवांसाठी दिवसरात्र झठत असतो. शेतकरी आणि मुक्या प्राण्यांचं प्रेम दाखवणारं अनोख दृश्य सोलापुरात बघायला मिळालं आहे. एका शेतकऱ्याने आपल्या गायीचे चक्क डोहाळा जेवणं घातलं आहे. शेतकऱ्याच्या या कृतीचं संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे. जिथे बघाव तिकडे या शेतकऱ्याच्या कृतीची चर्चा होताना दिसत आहे. त्यामागील कारणही तसंच आहे.

मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्याने आपल्या लाडक्या सुंदरी गायीचे डोहाळे जेवण घातले आहे. उमाकांत वेदपाठक या शेतकऱ्याने आपल्या घरी सुंदरी नामक गाईच्या नावाने डोहाळे जेवण घातले. मोहोळ तालुक्यातील बोपले गावामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुंदरी नावाच्या गाईला मेकअप करत, गायीच्या गळ्यात फुलाचे हार, शिंगाला हेंगुळ लावून बेगडे बसवण्यात आले.

पाच सुवासिनींनी ओटी भरली

गायीच्या शिंगाला गोंडे बांधत पाठीवर रंगीबेरंगी कपडे टाकण्यात आली होती. यावेळी पाच सुवासिनींनी ओटी भरत गाईसमोर फळे ठेवली आणि गायीची पूजा केली. यावेळी उपस्थित सर्व पाहुणेमंडळी आणि ग्रामस्थांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाचं अनेकांकडून कौतुक होत आहे.

कार्यक्रमाची जय्यत तयारी

उमाकांत वेदपाठक यांनी त्यांच्या सुंदरी गायीच्या डोहाळे जेवणाला गावकऱ्यांनीदेखील गर्दी केली होती. गायीच्या सोबत तिच्या एका वासराला देखील यावेळी सजवण्यात आलं होतं. अतिशय भक्तिभावाने गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. गायीसाठी पंचपक्वानांची मेजवानी बनवण्यात आली होती. विशेष म्हणजे लाडू, करंज्या, चकल्या असा फराळ गायीसाठी बनवण्यात आला होता. एखाद्या महिलेचं डोहाळे जेवण जसं केलं जातं अगदी तसाच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.