AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खुन्नस देऊन बघतोस काय म्हणत दोन गटात तुफान दगडफेक; दक्षिण सोलापूरात मुस्लिम नेत्यांचे कार्यकर्ते भिडले; 71 जणांवर गुन्हा

सोलापूर: दक्षिण सोलापूर (South Solapur) तालुक्यातील वळसंग (Walasang) येथे दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आली. मुस्लिम समाजाच्या दोन राजकीय नेत्यातील वर्चस्ववादातून दोन गटात दगडफेक (Throwing stones in two groups) करण्यात आली आहे. यामध्ये काही जण जखमी झाले असून एकामेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रहार संघटनेचा (Prahar Sanghtana) दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष मोहसीन तांबोळी आणि भाजप […]

खुन्नस देऊन बघतोस काय म्हणत दोन गटात तुफान दगडफेक; दक्षिण सोलापूरात मुस्लिम नेत्यांचे कार्यकर्ते भिडले; 71 जणांवर गुन्हा
भयंकर, सासरच्यांनी उभी पोर जाळलीImage Credit source: tv9
| Updated on: Jun 09, 2022 | 9:22 PM
Share

सोलापूर: दक्षिण सोलापूर (South Solapur) तालुक्यातील वळसंग (Walasang) येथे दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आली. मुस्लिम समाजाच्या दोन राजकीय नेत्यातील वर्चस्ववादातून दोन गटात दगडफेक (Throwing stones in two groups) करण्यात आली आहे. यामध्ये काही जण जखमी झाले असून एकामेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रहार संघटनेचा (Prahar Sanghtana) दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष मोहसीन तांबोळी आणि भाजप समर्थक यासीन कटरे या नेत्यांच्या गटाकडून दगडफेक करण्यात आली आहे.

एकमेकांकडे खुन्नस देऊन बघण्याच्या कारणावरून दगडफेक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. वळसंग पोलिसांकडून दोन्ही गटाविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.

एकमेकांविरोधा पोलिसात गुन्हा

दगडफेक का करण्यात आली आहे याचा तपास पोलीस करत असून एकमेकांविरोधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

दगडफेकप्रकरणी 71 जणांवर गुन्हा

दोन गटात तुफान हाणामारी झाल्यामुळे आणि दगडफेक झाल्यामुळे अनेक जण या जखमी झाले आहेत. याप्रकरणी परस्परांविरुद्ध तक्रार दाखल केली असून 71 जणांवर गुन्हा झाला आहे. ही घटना काल सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

दंगलीचा गुन्हा दाखल

वळसंग येथील मोहसीन तांबोळी यांच्या फिर्यादीनुसार यासीन कटारेसह 35 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यासीन कटरे याच्या फिर्यादीनुसार मोहसीन तांबोळीसह 36 जणांवर वळसंग पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.

संशयितांची धरपकड सुरू

मोहसीन वजीर तांबोळी, सैपन वजीर तांबोळी, हारुण बाबू फुलारी, मोहसीन ईसाक फुलारी, यासीन अब्बास कटरे, हजरत अब्बास कटरे, जावेद अब्बास कटरे, सोहेल अल्लाउद्दीन कटरे यांना अटक करण्यात आली असून तर उर्वरित संशयितांची धरपकड सुरू असल्याची माहिती वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी सांगितले.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.