AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्यांची चमक आता निघून गेली; पक्ष बदल करणाऱ्यांवर राष्ट्रवादीच्या नेत्यानं साधला निशाणा

रोहित पवार यांनी चमक आणि धमक काढत राष्ट्रवादीची उमेदवारी असताना अकलूजच्या विकासात राष्ट्रवादी काँग्रेसने कशा प्रकारे योगदान देत होती तेही त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्यांची चमक आता निघून गेली; पक्ष बदल करणाऱ्यांवर राष्ट्रवादीच्या नेत्यानं साधला निशाणा
| Updated on: May 07, 2023 | 5:57 PM
Share

सोलापूर : राज्यातील राजकारण अनेक मुद्यांनी गाजत असतानाच शरद पवार यांनी आज पुंढपुरात विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतले. राज्याच्या राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी असलेल्या शरद पवार यांनी आज पंढरपूर दौरा करत असताना त्यांच्या दौऱ्यानिमित्त शरद पवार यांची दूरदृष्टी किती प्रगल्भ आहे ते आमदार रोहित पवार यांनी सांगितले. शरद पवार यांच्या राजकीय हेलिकॉप्टरमधून केलेल्या प्रवासाची गोष्ट सांगताना त्यांनी सध्याच्या पिढीबद्दल बोलताना सांगितले की, हल्लीची पिढी ,जागा स्थान हे मोबाईल वरून पाहतात तर शरद पवार मात्र एका नजरेत हेलिकॉप्टरमधूनही गाव आणि ठिकाण सांगत असतात.

आजही शरद पवार यांनी हेलिकॉप्टरमधून जात असताना त्यांनी हा कुठला कारखाना, हे कुठले गाव हे अगदी बरोबर लक्षात आणून दिले.

आज हेलिकॉप्टर प्रवासामध्ये पवार साहेबांनी हेलिकॉप्टरमधून अकलूज आणि अकलूजचा कारखाना दाखवला. यावेळी रोहित पवार यांनी त्यांच्या या प्रवासात शरद पवार अजूनही कोणत्याही ठिकाणांची माहिती आणि तेथील सामाजिक परिस्थितीची आढावाही घेत ते माहिती देत असतात.

आज सोलापूर जिल्ह्यातील अकलूजविषयी बोलाताना रोहित पवार म्हणाले की, अकलूजला पूर्वी एक चमक होती, आणि धमक होती.

मात्र आज हेलिकॉप्टरमधून पाहताना अकलूजची धमक मावळल्याचे चित्र दिसले असल्याचे खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. चमक आणि धमक नाही हे सांगत असताना त्यांनी अकलूजच्या मोहिते पाटलांवर निशाणा साधत त्यांनी हल्लाबोल चढवत टीका केली.

मोहिते पाटील पूर्वी राष्ट्रवादीचे आणि शरद पवारांचे शिलेदार म्हणून ओळखले जात होते मात्र 2019 आली आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपाशी सलगी केली आणि भाजपाचे आमदार झाले आहेत.

2014 साली मोदी लाटेत विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीकडून खासदार झाले होते त्यामुळे राष्ट्रवादीशी मोहिते पाटील यांचा चांगलाच घरोबा होता मात्र आता त्यांनी भाजपाशी जवळीक साधल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी अकलूजची चमक आणि धमक काढत त्यांच्यावर टीका केली आहे.

रोहित पवार यांनी चमक आणि धमक काढत राष्ट्रवादीची उमेदवारी असताना अकलूजच्या विकासात राष्ट्रवादी काँग्रेसने कशा प्रकारे योगदान देत होती तेही त्यांनी यावेळी सांगितले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.