AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol-Diesel Rate Hike: राज्यात पेट्रोलची दरवाढ? सर्वसामान्यांच्या खिळाला महागाईची झळ? अपडेट काय?

Petrol-Diesel Rate Hike: राज्यात पेट्रोलची दरवाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. आखाती देशांमधील युद्धामुळे गॅस दरवाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 60 रुपयांची वाढ झाली आहे. तर त्या पाठोपाठ पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची भीती व्यक्त होत होती. याविषयीची मोठी अपडेट समोर आली आहे.

Petrol-Diesel Rate Hike: राज्यात पेट्रोलची दरवाढ? सर्वसामान्यांच्या खिळाला महागाईची झळ? अपडेट काय?
पेट्रोल-डिझेल दरवाढImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 20, 2026 | 9:56 AM
Share

Petrol-Diesel Rate Hike: जागतिक बाजारात कच्चा तेल्याच्या किंमतीत शुक्रवारी मोठी घसरण दिसून आली. पण देशातील महागनगरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ दिसून आली. ही दरवाढ किरकोळ असली तरी त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. गेल्या चार वर्षांपासून देशातील इंधनाच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही. पण आखाती देशातील युद्धाचा मोठा फटका कच्चा तेलाच्या पुरवठ्यावर होत आहे. देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती या महिन्यात 60 रुपयांनी वाढल्या. तर त्या पाठोपाठ पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकण्याची भीतीही नागरिकांमध्ये आहे. आज पुणे, सोलापूरसह अनेक शहरात पेट्रोलच्या किंमतीत वाढ दिसून आली.

पॉवर आणि स्पीड पेट्रोल दरात वाढ

सोलापुरात साध्या पेट्रोलचे दर स्थिर आहेत. मात्र स्पीड पेट्रोलच्या दरात 2 रुपयांची वाढ दिसून आली. सोलापुरातील पेट्रोल पंपावर साधे पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. साधे पेट्रोल 104 रूपये तर स्पीड पेट्रोल 111 वरून 113 रूपये झाले. साधं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आहेत त्याच आहेत मात्र स्पीड पेट्रोल दोन रुपयांनी वाढले. पुण्यातही अशीच दरवाढ झाली आहे. आमच्याकडे पेट्रोलचा साठा स्थिर आहे कोणताही तुटवडा नाही मात्र काही ग्राहक गर्दी करत असल्याचे पेट्रोलपंप चालकांचे म्हणणे आहे.

कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ

आखाती देशात कच्चे तेल गुरूवारी 119 डॉलर प्रति बॅरलपेक्षा जवळपास 14 डॉलर प्रति बॅरलने स्वस्त झाले. तर दुसरीकडे अमेरिकन क्रूड डब्ल्यूटीआयचा भाव गुरुवारी 100 डॉलर प्रति बॅरलपेक्षा 8 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरला. युद्ध सुरू असताना भाव घसरल्याने कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे एक वक्तव्य आले आहे. त्यानुसार, इराण आता कमकुवत झाला आहे. त्याचाकडे युद्ध लढण्यासाठी रसद नाही. त्यामुळे हे युद्ध लवकरच संपणार असा दावा त्यांनी केला होता. तेव्हापासून किंमतींवर परिणाम दिसून येत आहे.

चार महानगरातील भाव काय

IOCL च्या आकडेवारीनुसार, चार महानगरांपैकी तीन महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती क्रमशः 94.77 रुपये आणि 87.67 रुपये प्रति लिटर आहेत. तर कोलकत्तामध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक 105.41 रुपये इतका आहे. तर डिझेलची किंमत 92.02 रुपये प्रति लिटर इतकी आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलची किंमत क्रमशः 103.54 रुपये आणि 90.03 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईत पेट्रोल 101.06 रुपये प्रति लिटर तर डिझेलची किंमत 92.61 रुपये प्रति लिटर इतकी आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!