Rajendra Raut Video : आमदार राजेंद्र राऊतांनी थेट कानाखाली मारली, व्हिडिओ व्हायरल, पण कारण काय?

Rajendra Raut Video : आमदार राजेंद्र राऊतांनी थेट कानाखाली मारली, व्हिडिओ व्हायरल, पण कारण काय?
आमदार राजेंद्र राऊतांनी थेट कानाखाली मारली
Image Credit source: tv9

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओत आमदार साहेब थेट एकाच्या कानाखाली मारताना दिसून येत आहेत. मात्र कानाखाली का मारली? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

सागर सुरवसे

| Edited By: दादासाहेब कारंडे

May 29, 2022 | 3:43 PM

सोलापूर : सोलापुरातील बार्शीचे भाजप (BJP) पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता आमदारांनी चक्क एका कार्यकर्त्याच्या कानशिलात लागवल्याचा व्हिडीओ वायरल (Viral Video) झालाय. बार्शीत एका क्रिकेटच्या अंतिम सामन्याच्या कार्यक्रमावेळी आमदार राजेंद्र राऊत यांच्या पाया पडण्यासाठी एक व्यक्ती आला होता. तो आमदारांच्या चरणावर मस्तक ठेवून नतमस्तक झाला मात्र तो जसा पाया पडून वर उठला तशी आमदारांनी त्याच्या कानशिलात लगावली. या कानशिलात लगवल्याचं कारण अद्याप तरी अस्पष्ट आहे मात्र आमदारसाहेबांच्या पाया पडून कानाखाली प्रसाद मिळालेल्या घटनेचा व्हिडीओ जिल्हाभरात चांगलाच वायरल झालाय. तसेच एखाद्याने पाया पडल्यानंतर कोणताही व्यक्ती पाया पडणाऱ्याची चूक माफ करतो मात्र बार्शीत नेमकं उलटं घडलं. पाया पडला आणि व्यक्ती कानाखाली प्रसाद घेऊन गेल्याचे पहायला मिळाले.

मारहाणीचा व्हिडिओ

व्हिडिओत नेमकं काय?

हा व्हिडिओ बारकाईने पाहिला तर सुरूवातीला आमदार साहेब आपल्या कार्यकर्त्यांसोबत बसलेले दिसत आहेत. यावेळी समोर क्रिकेटचे सामने सुरू असल्याचे दिसते. या सामन्याची लाईव्ह कॉमेंट्रीही स्पीकरवर सुरू असल्याचे या व्हिडिओत ऐकायला येत आहे. तेवढ्यात एक व्यक्ती राजेंद्र राऊत बसलेले आहेत. त्यांच्या उजव्या बाजुने गर्दीतून वाट काढत पुढे येताना दिसत आहे. ही व्यक्ती आमदार साहेबांपुढे येताच त्यांच्या पायावर डोकं टेकवत आहे. बराच वेळ ही व्यक्ती आपलं डोकं हे आमदारांच्या पायावरून उचलायला तयार नाही. आमदार त्यांच्या खांद्याला पकडून त्यांना उठण्याचा आग्रह करतानाही दिसत आहेत. मात्र जसे ती व्यक्ती पायांवरून उठते. तेव्हाच आमदार त्यांच्या चेहऱ्याकडे पाहतात. आणि थेट जोरात एक कानाखाली लगावतात. आणि त्या व्यक्तीला आपल्या समोरून जायला सांगतात. त्यानंतर ही व्यक्ती आमदारांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र इतर कार्यकर्ते जमत त्यांना बाजुला करण्याचा प्रयत्न करत आहे.

कुठे घडला हा प्रकार?

बार्शीतील मातोश्री रमाई चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी ही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अंतिम सामन्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेंद्र राऊत आले होते. त्यावेळचा हा प्रकार आहे. मात्र मारहाणीचे कारण अद्याप अस्पष्ट असून मारहाण झालेला व्यक्ती अद्याप समोर आला नाही. संबंधित व्यक्तीने मद्यप्राशन केल्याने मारहाण केल्याचे राऊत गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मात्र आमदार पदावरच्या वक्तीनेच आशी कानखाली मारल्याने आता उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

हे सुद्धा वाचा

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें