ऐन यात्रेत रथाचे चाक निसटले आणि दुर्घटना घडली; या यात्रेतील सर्व कार्यक्रम झाले रद्द..

यंदा सूर्यास्ताच्या दरम्यान हा रथ ओढत असताना अचानकपणे ही दुर्दैवी घटना घडल्याने मोठी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ऐन यात्रेत रथाचे चाक निसटले आणि दुर्घटना घडली; या यात्रेतील सर्व कार्यक्रम झाले रद्द..
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 10:58 PM

अक्कलकोट : सोलापूर जिल्ह्यातील वागदरीमध्ये सध्या यात्रा अगदी उत्साहात सुरू होती. या यात्रेमुळे हजारो भाविक या यात्रेसाठी दाखल झाले होते. अक्कलकोट शहरापासून वागदरी येथील ग्रामदैवत परमेश्वर यात्रा उत्सव काळात ठेर (रथ) ओढणे हा धार्मिक कार्यक्रम सुरू होता. त्यामध्ये अचानकपणे रथाच्या चाकाचा पार निसटल्याने दुर्घटना होवून दोघे भाविक गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर काही तासातच त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री घडली.या दुर्घटनेमुळे तालुक्यात जोरदार खळबळ माजली आहे.

याबाबत प्राप्त मिळालेली अधिक माहिती अशी की, वागदरी येथील ग्रामदैवत परमेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात चालु होती. मोठ्या प्रमाणात सीमावर्ती भागातून भाविक यात्रेकरिता जमले होते.

यात्रेतील मुख्य घटक रथ ओढणे परमेश्वर मंदिर ते बसस्थानक भागापर्यंत असंख्य भाविक रथ ओढत असतात. सुमारे 12 फुट रुंदी असलेल्या रथाचे गोलाकार दगडी चाकं आहेत.

हा रथ ओढताना धार्मिक विधीवेळी परमेश्वर महाराज की जय…! ची घोषणा देतात व रथावर खारीक प्रासादिक वस्तूंचे उधळण करतात.

यंदा सूर्यास्ताच्या दरम्यान हा रथ ओढत असताना अचानकपणे ही दुर्दैवी घटना घडल्याने मोठी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या पैकी संजय नंदे, गंगाराम गाडीवर हे सद्भक्त गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर वागदरी येथील परमेश्वर यात्रा उत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

या यात्रेत दुर्घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही यात्रा मोठ्या उत्साहात होत असते. मात्र यंदा या दुर्घटनेचे गालबोट लागल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.