AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ना नेता ना पक्ष, धनगर आरक्षण एकच लक्ष’ धनगर समाजाचा पुन्हा एल्गार; आमरण उपोषण केलं जाणार

Solapur Dhangar Reservation : धनगर आरक्षणाचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. धनगर समाजाने पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. सोलापुरातून आमरण उपोषणाचा नारा देण्यात आला आहे. कधीपासून सुरु होणार आहे हे आंदोलन? उपोषणासंदर्भातली महत्वाची अपडेट, वाचा सविस्तर बातमी...

'ना नेता ना पक्ष, धनगर आरक्षण एकच लक्ष' धनगर समाजाचा पुन्हा एल्गार; आमरण उपोषण केलं जाणार
Image Credit source: tv9
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 31, 2024 | 11:05 AM
Share

मराठा आणि ओबीसी आंदोलनाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. अनेकदा उपोषण केलं जातं. आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आंदोलन केलं जातं. असं असतानाच आता धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. महाराष्ट्रात धनगर समाजाकडून पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आला आहे. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधव राज्यस्तरीय आमरण उपोषण करणार आहेत. येत्या 9 सप्टेंबरपासून हे उपोषण सुरु होणार आहे. सकल धनगर समाज संघटनेचे समन्वयक अमोल कारंडे यांनी या संदर्भात घोषणा केली आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी या आंदोलनाची रूपरेषा सांगितली.

कधी केलं जाणार आमरण उपोषण?

धनगर आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आंदोलन केलं जाणार आहे. सकल धनगर समाज संघटनेच्या वतीने या आंदोलनाची घोषणा केली जाणार आहे. येत्या 9 सप्टेंबरपासून हे आंदोलन सुरु होणार आहे. पंढरपूरमध्ये आमरण उपोषण केलं जाणार आहे. ‘ना नेता ना पक्ष; धनगर आरक्षण एकच लक्ष’ असा नारा देत या आमरण उपोषणाची घोषणा करण्यात आली आहे. जेजुरीतील खंडेरायाचं दर्शन घेत या उपोषणाची सुरुवात होणार आहे.

आंदोलक अमोल कारंडे यांनी काय म्हटलं?

सकल धनगर जमातीच्यावतीने 9 सप्टेंबरपासून पंढरपूरमध्ये आमरण उपोषणाला बसणार आहे. सकल धनगर समाज या बॅनरखाली ‘ना नेता ना पक्ष; धनगर आरक्षण एकच लक्ष’ असा नारा देत सामुहिक नेतृत्वात हे उपोषण करणार आहे. 1 सप्टेंबर रोजी जेजुरी येथून मल्हारी मार्तंड खंडेराया जेजुरीत भंडारा उधळून पंढरपूरच्या दिशेने धनगर बांधव मोठ्या संख्येने येणार आहेत. पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल धनगर समाजाच्या वतीने प्राणांतिक उपोषणाची सुरुवात केली जाणार आहे, असं सकल धनगर समाज संघटनेचे समन्वयक अमोल कारंडे यांनी सांगितलं आहे.

राज्यातील सहाही पक्षांनी धनगर आरक्षणाच्या बाबतीत कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आता राज्यातील सर्व धनगर समाजाचे कार्यकर्ते, नेते आमरण उपोषण करणार आहोत, असं सकल धनगर समाज संघटनेचे समन्वयक अमोल कारंडे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल