Solapur : करमाळा- चिखलठाण रस्त्याचे तीनतेरा, रस्ता दुरुस्त न केल्यास मतदानावर बहिष्कार टाकू, ग्रामस्थांचा इशारा

करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या चिखलठाण येथील कोटलिंग देवस्थानकडे जाणारा हा एकमेव रस्ता असून या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी हा रस्ता फारच खराब झाला आहे.

Solapur : करमाळा- चिखलठाण रस्त्याचे तीनतेरा, रस्ता दुरुस्त न केल्यास मतदानावर बहिष्कार टाकू, ग्रामस्थांचा इशारा
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 12:10 PM

सोलापूर : करमाळा तालुक्यातील जेऊर ते चिखलठाण या रस्त्यावर (Road) अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्याने ये जा करताना वाहनचालकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामस्थांकडून केली जातंय. रस्ता दुरुस्त न केल्यास या भागातील ग्रामस्थांनी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकांवर (Election) बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिलांय. गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावरील खड्डे बुजवून डांबरीकरण करण्याची मागणी केली जातंय. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांनी मतदानावर (Voting) बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलायं.

रस्त्याचे डांबरीकरण करून देण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष

करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या या रस्त्यावरून दरवर्षी दहा लाख टन उसाचे वाहतूक होते. याशिवाय करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या चिखलठाण येथील कोटलिंग देवस्थानकडे जाणारा हा एकमेव रस्ता असून या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी हा रस्ता फारच खराब झाला आहे. या रस्त्याने वाहने चालवणे अवघड झाले असून अनेक दिवसांपासून मागणी रस्त्यांच्या डांबरीकरणाची मागणी केली जातंय.

हे सुद्धा वाचा

जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

तालुक्यातील कुगाव, चिखलठाणनंबर एक व‌ चिखलठाण नंबर दोन, केडगाव, शेटफळ या गावाला जाणारा हा एकमेव रस्ता आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यात पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाहीयं आणि यामुळे गाड्या थेट खड्डयात जाते. चिखलठाण नंबर दोन व कुगाव या गावाला जाणारी एसटी बससेवा या खराब रस्त्यामुळे बंद केलीयं. यामुळे ग्रामीन भागातील लोकांचे प्रचंड हाल होत आहेत.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.