Sugarcane Price: ऊस दरावरून भडका? 3,500 भावावर शेतकरी संघटना ठाम, कारखानदारांचा भाव काय? सोलापूरमध्ये तोडगा निघणार की आंदोलन पेटणार?

Solapur Sugarcane Price: ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात रात्री उशीरापर्यंत बैठक झाली. 3,500 भावावर शेतकरी संघटना ठाम होती. कारखानदारांचा भाव काय? सोलापूरमध्ये तोडगा निघणार की आंदोलन पेटणार?

Sugarcane Price: ऊस दरावरून भडका? 3,500 भावावर शेतकरी संघटना ठाम, कारखानदारांचा भाव काय? सोलापूरमध्ये तोडगा निघणार की आंदोलन पेटणार?
ऊस दरावरून भडका? 3,500 भावावर शेतकरी संघटना ठाम, कारखानदारांचा भाव काय? सोलापूरमध्ये तोडगा निघणार की आंदोलन पेटणार?
| Updated on: Nov 19, 2026 | 6:42 AM

Solapur Sugarcane Price: कोल्हापूर, सातारा आणि सांगली नंतर आता सोलापूरमध्ये ऊसदरावरून शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. ऊसदारावरून वाढलेला पेच सोडवण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात रात्री उशीरापर्यंत बैठक झाली. पालकमंत्र्यांनी जवळपास अडीच तास शेतकरी संघटना आणि कारखानदारांमध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न केला. पण ऊस दरावर एकमत होण्याचा सूर दिसला नाही. शेतकरी संघटना 3,500 भावावर ठाम दिसली. तर कारखानदारांनी 3,150 रुपयांपर्यंत मजल मारली. शेतकरी संघटनाही मागे हटली नाही. त्यामुळे आता पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोन दिवसात चित्र होणार स्पष्ट

Loading...

दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऊसदराप्रकरणी शेतकरी संघटना आणि कारखानदारांमध्ये मध्यस्थी केली. त्यांनी पहिली उचल 3,250 रुपये आणि गाळप संपल्यावर 100 रुपये देण्याचा प्रस्ताव मांडला. शेतकरी संघटनांनी पहिली उचल 3,300 रुपये तर गाळप संपल्यानंतर 100 रुपये आणि पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी 100 रुपये अतिरिक्त असा एकूण 3,500 रुपये दर मागितला आहे. तर या प्रस्तावानंतर कारखानदारांनी त्यांची भूमिका मांडण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागून घेतला. यामुळे येत्या दोन दिवसात ऊस दराचे चित्र स्पष्ट होईल.

तर 22 नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलन

कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात बुधवारी बैठक झाली. शेतकरी संघटना 3500 रुपये भावावर ठाम आहे. तर साखर कारखानदारांनी 3150 रुपये भाव देणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे कोंडी फोडण्याची अवघड कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे. याविषयीचे पत्रक काढणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. येत्या दोन दिवसात कारखानदार कोणती भूमिका घेतात आणि शेतकरी संघटना काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर लवकर निर्णय झाला नाही तर शेतकरी संघटनेने 22 नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शेतकरी संघटनेने दोन कारखान्यांचे गाळप थांबवले

जिल्हाधिकारी याच्यां आदेशाला ठेंगा देत कारखान्याचे धुराडे (गाळप) सुरु असल्याने माढ्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी आक्रमक पवित्रा घेतलाय- कार्यकर्त्यानी गाळप थांबवून कारखाना बंद केला. सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिक एन यांनी ऊस दर जाहीर होई पर्यत कारखान्याचे गाळप बंद ठेवण्याचे लेखी आदेश काढले होते. मात्र तरी देखील जिल्हाधिकारी याच्यां आदेशाला ठेंगा देत कारखान्याचे धुराडे (गाळप) सुरु असल्याने माढ्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी आक्रमक पवित्रा घेतला. माजी आमदार बबनराव शिंदे चेअरमन असलेल्या माढ्याच्या पिंपळनेर मधील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यासह- बोत्रे पाटलाच्या म्हैसगाव मधील ओंकार शुगर या दोन कारखान्यातील गव्हाणीत उतरुन गाळप थांबवून दोन्ही कारखाने बंद केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us