
Shivsena Alliance against BJP: स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी सर्वच राजकीय पक्षांच्या राजकीय द्वेषाला आणि धोरणांना वेशीवर टांगले आहे. कोणत्या पक्षाचं सूत कोणत्या पक्षासोबत जुळलं हेच कळत नाही. कुठं एमआयएम-भाजपचे सूर जुळालेत. तर कुठं भाजप-काँग्रेस आघाडीची दवंडी देण्यात आली. आता दोन्ही शिवसेनेची दिलजमाई झाल्याचे दिसून येत आहे. सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी भाजपविरोधात शड्डू ठोकले आहे. भाजपला मिनी मंत्रालयातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हा प्रयोग करण्यात येत आहे हे विशेष.
झेडपी निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र
सोलापूरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र येत आहे. बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही शिवसेनेची महाआघाडी आहे. विशेष म्हणजे भाजपविरोधात दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी मिळून महाआघाडी स्थापन करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत मेळाव्याला येण्याचे आवाहन केले आहे. या महाआघाडीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल विरुद्ध भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊतांच्या नेतृत्वात या निवडणुका लढल्या जाणार आहेत. एकीकडे संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटासोबत कदापी जाणार नाही अशी भूमिका घेतलेली असताना दुसरीकडे दोन्ही शिवसेना एकत्रित निवडणूक लढत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरचं राजकारण वेगळं असतं हे समोर आले आहे.
संजय राऊत यांची तीव्र नाराजी
तर सोलापूरात दोन्ही शिवसेना एकत्र आल्याची माझ्याकडे कोणती माहिती नाही. दोन्ही शिवसेना एकत्र आल्याची अधिकृत माहिती आलेली नाही. तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ही अधिकृत भूमिका नाही अशी खणखणीत प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. शिंदे सेनेसोबत आमच्या भावना तीव्र आहेत. तर सोलापूरातील घाडमोड माहिती नसली तरी त्याविषयीची माहिती लवकरच घेणार असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले. सोलापूरातील स्थानिक घाडमोडींबाबत वरिष्ठ नाराज असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही आघाडी किती दिवस टिकते याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
भाजपच्या गटनेत्याची आज निवड
सोलापूर महापालिकेसाठी आज भाजपच्या गटनेत्याची आज निवड केली जाणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत गटनेता निवडीबाबत बैठक होणार आहे. गटनेते तसेच महापौर पदासाठी भाजपचे विनायक कोंड्याल, अनंत जाधव, डॉ. किरण देशमुख आणि नरेंद्र काळे यांची नावे चर्चेत आहेत. आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पक्षाने नूतन नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पक्षाच्या गटनेत्याची निवड करण्यात येणार आहे. भाजपने अद्याप कोणतीही भूमिका जाहीर न केल्याने ऐनवेळी कोणाचे नाव समोर येते याकडे सर्वांचे लक्ष