दुकानदारांनी रॅपिड अँटीजन टेस्ट करा, रिपोर्ट गिऱ्हाईकांना दिसेल असा लावा, सोलापूर पालिका उपायुक्तांचे आदेश

सोलापूर शहरातील फेरीवाले, दुकानदारांनी रॅपिड अँटिजेन टेस्ट करून त्याचा अहवाल दर्शनी भागात लावण्याचे आदेश पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिले आहेत. Solpaur Municipal Corporation orders shopkeepers and vendors should do rapid antigen test within ten days

दुकानदारांनी रॅपिड अँटीजन टेस्ट करा, रिपोर्ट गिऱ्हाईकांना दिसेल असा लावा, सोलापूर पालिका उपायुक्तांचे आदेश

सोलापूर : शहरातील कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सोलापूर महापालिकेने फेरीवाले आणि दुकानदारांना कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. सोलापूर शहरातील फेरीवाले, दुकानदारांनी रॅपिड अँटिजेन टेस्ट करून त्याचा अहवाल दर्शनी भागात लावण्याचे आदेश पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिले आहेत. (Solpaur Municipal Corporation orders shopkeepers and vendors should do rapid antigen test within ten days)

कोरोना चाचणी न करता पालिकेच्या आदेशाचा भंग केल्यास दुकानदारांना दंड आकारण्यात येणार असून त्यांचा परवानाही रद्द करण्यात येणार आहे. सोलापूर शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी आता सण उत्सवाच्या काळात बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. या कालावधीत कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे याला आळा बसण्यासाठी फेरीवाले दुकानदार यांना कोरोना रॅपिड अँटिजेन टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दुकानदार आणि फेरिवाल्यांना जवळच्या आरोग्य केंद्रात कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर महानगरपालिकेकडून संबंधित दुकानदार आणि फेरीवाल्यांनी कोरोना चाचणी केलीय का आणि त्याचा अहवाल दर्शनी भागात लावलाय का? तपासणी करण्यात येणार आहे. त्यांच्याकडे अहवाल नसेल तर संबंधितांच्या विरोधात पोलीस कारवाई सुद्धा करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सोलापूरमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. सणासुदीच्या काळात बाजारपेठांमध्ये गर्दी होण्याची शक्यता असल्याने किराणा दुकानदार, फळविक्रेते, फेरीवाले यांना रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली. जे आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

Raksha Bandhan | सोलापूरात डॉक्टारांनी बांधल्या कोरोनाबाधित रुग्णांना राख्या

Solapur Operation Zero Corona | कोरोनाला घेरण्याचं लक्ष्य, सोलापूर पोलिसांचं ऑपरेशन ‘झिरो कोरोना’

(Solpaur Municipal Corporation orders shopkeepers and vendors should do rapid antigen test within ten days)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *