AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेहुण्याच्या लग्नाचा आधीच जावयाचा सासू, सासऱ्यावर हल्ला, जीवघेण्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

बापूराव मासाळ यांचा मोठा मुलगा बाळकृष्ण मासाळ याचे 6 मे रोजी लग्न होते. मात्र, लग्नाच्या 10 दिवस आधीच दुर्दैवी घटना घडली. आरोपी मंगेश सलगर विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहुण्याच्या लग्नाचा आधीच जावयाचा सासू, सासऱ्यावर हल्ला, जीवघेण्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
मंगेश देविदास सलगर, बापूराव मासाळ
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 29, 2025 | 1:58 PM
Share

सोलापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. मेहुण्याचे लग्न काही दिवसांवर असताना जावयाने सासू, सासरे आणि मेहुणा यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सासऱ्याचा मृत्यू झाला. सासू आणि मेहुणा गंभीर जखमी झाले. मोहोळ तालुक्यातील रामहिंगणे गावात हा धक्कादायक प्रकार घडला. विशेष म्हणजे जावयाने पोलिसांना फोन करुन पाच ते सहा जण आपणास मारत असल्याचे सांगितले होते. पत्नीला नांदवायला पाठवत नसल्याच्या संतापातून जावयाने हा प्रकार केला.

मोहोळ तालुक्यातील वडवळ स्टॉप परिसरात राहणाऱ्या मंगेश देविदास सलगर यांचे लग्न रामहिंगणी येथील बापूराव मासाळ यांची मुलगी निशा सोबत झाले होते. मात्र, कौटुंबीक वादामुळे निशा ही गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून सासरी गेली नाही. गेल्या अडीच वर्षांपासून पत्नीला नांदवायला पाठवत नाही. तसेच न्यायालयात पोटगीसाठी दावा केल्यामुळे जावई मंगेश सलगर यांचा सासू, सासऱ्यावर राग होता. त्या रागातून मंगेश याने सासू-सासऱ्यांवर हल्ला करण्याची योजना तयार केली.

मंगेश सलग याने घराच्या पोर्चमध्ये झोपलेल्या सासरे बापूराव मासाळ यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या तोंडावर, अंगावर व पायावर चाकून अनेक वार केले. त्या हल्‍ल्‍यात सासरे बापूराव मासाळ यांचा मृत्यू झाला. बापूराव मासाळ यांच्यावर हल्ला करत असताना मेहुणा अभिषेक बापूराव मासाळ आणि त्याची आई वाचवण्यासाठी गेले. त्यावेळी त्याने त्यांच्यावरही हल्ला केला. त्यानंतर 112 नंबरवर कॉल केला. मला या ठिकाणी पाच ते सहा जण मारत आहे, मला वाचवा, असे त्याने पोलिसांना सांगितले. मंगेश सलगर याने स्वतःलाच इजा करून घेतली होती.

मंगेश सलग याच्या फोननंतर मोहोळ पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्यानेच खून करून इतर दोघांना जखमी केल्याचे पोलिसांना दिसले. जखमी झालेल्या सासू आणि मेव्हण्यावर सोलापुरात उपचार सुरू आहे. कौटुंबिक वादातून त्याने हा हल्ला केल्याची कबुली पोलिसांकडे दिली.

बापूराव मासाळ यांचा मोठा मुलगा बाळकृष्ण मासाळ याचे 6 मे रोजी लग्न होते. मात्र, लग्नाच्या 10 दिवस आधीच दुर्दैवी घटना घडली. आरोपी मंगेश सलगर विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर, मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे तातडीने पोहचले. त्यांनी पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या. तसेच फॉरेन्सिक टीमच्या पथकाने गुन्ह्याच्या संदर्भाने नमुने घेतले आहेत.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू