मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ बैठक, अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या निर्णयाची शक्यता

अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल असं बोललं जात आहे. (Cabinet Meeting on Maratha Reservation And FYJC Admission)

मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ बैठक, अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या निर्णयाची शक्यता
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 3:46 PM

मुंबई : मराठा आरक्षण याचिकेवर सुनावणी सर्वोच्च न्यायलयाने 4 आठवड्यासाठी पुढे ढकलली आहे. त्यामुळे सर्व मराठा समाजाचे लक्ष प्रवेश प्रक्रियेसह नोकर भरतीकडे लागलं आहे. दरम्यान राज्य सरकार इयत्ता अकरावी प्रवेशप्रक्रियेबाबत उद्या निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल असं बोललं जात आहे. (Cabinet Meeting on Maratha Reservation And FYJC Admission)

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर अकरावी प्रवेशाला स्थगिती देण्यात आली होती. आज सुनावणी झाल्यानंतर राज्य सरकारने महाधिवक्ता यांच्याकडून याबाबत संपूर्ण माहिती मागितली आहे.  त्यानतंर मराठा आरक्षण आणि अकरावी प्रवेशाबाबत उद्या कॅबिनेटची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत अकरावी प्रवेशाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – Maratha Reservation LIVE | मराठा आरक्षण सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली

मराठा आरक्षण याचिकेवर आज काहीच करू शकत नाही. तुम्ही घटनापीठासमोर जा, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण याचिकेवरील सुनावणी 4 आठवड्यासाठी पुढे ढकलली आहे. तर, याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी उद्याच घटनापीठासमोर जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

न्यायमूर्ती एल.एन.राव यांच्या खडंपीठासमोर आज झालेल्या युक्तीवादात, सुरुवातीला खंडपीठाने ही सुनावणी काही काळासाठी तहकूब केली होती. त्यानंतर पुन्हा युक्तीवाद झाल्यानंतर, कोर्टाने ही सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली. याचिकाकर्त्यांनी यादरम्यान घटनापीठाकडे आपलं म्हणणं मांडावं असंही कोर्टाने नमूद केलं. त्यामुळे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी उद्याच घटनापीठासमोर जाणार असल्याचं सांगण्यात आल्याने उद्या घटनापीठासमोर काय निर्णय होतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या सुनावणी वेळी राज्य सरकारचा एकही वकील उपस्थित नव्हता. हे दुर्देवी असून गंभीर आहे. त्यामुळे अशोकराव, तुम्ही जिथे असाल तिथून कोऑर्डिनेट करा आणि कोर्टात वकिलांना हजर राह्यला सांगा, अशी कळकळीची विनंती भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली होती. (Cabinet Meeting on Maratha Reservation And FYJC Admission)

संबंधित बातम्या :

Maratha Reservation ! आज काहीच करू शकत नाही, अर्जदारांनी घटनापीठापुढे जावे: सर्वोच्च न्यायालय

मराठा आरक्षण : सरपंचपदाच्या मुदतवाढीचा उल्लेख, सुप्रीम कोर्टात नेमकं काय काय झालं?

Non Stop LIVE Update
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.