AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांना नेमकी किती मदत मिळणार, पहिल्यांदाच आकडे समोर, सरकारचे धोरण काय?

राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. आता अतिवृष्टीग्रस्तांना अतितातडीची मदत दिली जाणार आहे. त्यासाठी सरकारदरबारी हालचाली वाढल्या आहेत.

शेतकऱ्यांना नेमकी किती मदत मिळणार, पहिल्यांदाच आकडे समोर, सरकारचे धोरण काय?
maharashtra floods
| Updated on: Sep 25, 2025 | 8:24 PM
Share

Maharashtra Flood : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी कोलमडून गेला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतातील पूर्म पीकच वाहून गेले आहे. हाता-तोंडाशी आलेल्या पिकाची नासधूस झाली आहे. काही लोकांच्या घरात पाणी शिरले आहे तर काही गावांत लोकांची घरे अक्षरश: पडून गेली आहेत. दरम्यान, राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना भरीव मदत करावी अशी मागणी केली जात आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. असे असतानाच आता सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या मदतीचे संभाव्य स्वरुप समोर आले आहे. लवकरच या मदतीचे वाटप चालू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोणत्या नुकसानीसाठी किती रुपये मिळण्याची शक्यता?

सरकार अतिवृष्टीग्रस्तांना अतितातडीची मदत करणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी शिल्लक नसेल तर उणे बजेटमधून ही मदत केली जाण्याची शक्यता आहे. व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला 4 लाखांची मदत दिली जाऊ शकते. तसेच दुग्धप्राण्यांचा मृत्यू झाल्यास 37 हजार 500 रुपयांची मदत दिली जाण्याची शक्यता आहे. मेहनतीचे (ओढ काम) काम करणाऱ्या जणाऱ्या जनावरे दगावल्यास 32 हजार रुपयांची मदत केली जाईल असे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार घरांची पडझड झाल्यास प्रति झोपडी 8 हजार रुपयांची मदत दिली जाईल. तसेच पक्क्या घरांची पडझड झाल्यास ही मदत 12 हजार रुपयांपर्यंत मिळू शकते.

केंद्राकडे मागितली जाणार मदत

दरम्यान, शेतकरी, स्थानिक लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, असे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सरकारनेही महाराष्ट्रात शेतकरी हवालदील झाल्याचे मान्य केले आहे. सरकारकडून मदतीचे निकष बाजूला ठेवून मदत दिली जाईल, असेही सांगितले जात आहे. राज्यातील नुकसान मोठे असल्यामुळे आता राज्य सरकार केंद्र सरकारला पत्र लिहून मोठ्या आर्थिक मदतीची मागणी करणार आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार राज्याला नेमके किती रुपये देणार? राज्य सरकार नेमकी किती आणि कशी मदत करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.