शाळेचा जिना चढताना चक्कर येऊन खाली पडली, विद्यार्थीनीचा उपचारादरम्यान मृत्यू

शाळेचा जिना चढताना चक्कर येऊन खाली पडल्याने विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली. उपचारासाठी इस्पितळात दाखल केलं असता उपचारादरम्यान विद्यार्थीनीचा मृत्यू झाला.

शाळेचा जिना चढताना चक्कर येऊन खाली पडली, विद्यार्थीनीचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव :  शाळेचा जिना चढताना चक्कर येऊन खाली पडल्याने विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली. उपचारासाठी इस्पितळात दाखल केलं असता उपचारादरम्यान विद्यार्थीनीचा मृत्यू झाला. जळगावात ही सुन्न करणारी घटना घडली आहे. (jalgaon Student died while undergoing treatment due to dizziness while climbing the school stairs)

जळगाव शहरातील अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थींनीचा चक्कर येवून पडल्याने अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली. सकाळची शाळा असल्याने वर्गात जाण्यासाठी विद्यार्थीनी जिना चढत होती. याचदरम्यान तिला चक्कर आली.

अधिक माहिती अशी की, मिधहत फातेमा नईम शेख (वय-17) रा. शाहु नगर, जळगाव ही मुलगी शहरातील हॉजी नूर मोहंम्मद चाचा उर्दू हायस्कूलमध्ये अकरावीच्या वर्गात शिकते. तिच्या आईने तिला शाळेत दुचाकीने सोडले. विद्यार्थीनी मिदहद फातेमा ही वर्गात जाण्यासाठी जिना चढताना अचानक तिला चक्कर आल्याने ती खाली पडली. यात ती गंभीर जखमी झाली.

जिन्यावरुन खाली पडल्यानंतर मिदहद फातेमाला उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले असता तीची प्रकृती गंभीर असल्याने तिला जिल्हा शासकीय महाविद्यालयात रवाना करण्याची डॉक्टरांनी सूचना केली. यानुसार तिला शासकीय महाविद्यालयात दाखल केल्यानंतर अगदी काही वेळात वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तिला मयत घोषित केले.

(Student died while undergoing treatment due to dizziness while climbing the school stairs)

हे ही वाचा

आईच्या प्रियकराची निर्घृण हत्या, मुंबईतील धारावी हादरली

आधी हवेत गोळीबार, नंतर डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न; पनवेलमध्ये थरार!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI