उत्तर प्रदेशच्या कन्नोजमध्ये चक्रीवादळ आणि गारांचा पाऊस, 6 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशच्या कन्नोज जिल्ह्यात चक्रीवादळ आणि गारांच्या पावसामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे (Cyclone and hail storm in UP Kannauj).

उत्तर प्रदेशच्या कन्नोजमध्ये चक्रीवादळ आणि गारांचा पाऊस, 6 जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: May 31, 2020 | 8:43 AM

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या कन्नोज जिल्ह्यात चक्रीवादळ आणि गारांच्या पावसामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे (Cyclone and hail storm in UP Kannauj). तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कन्नोज जिल्ह्याच्या तिर्वा परिसराला चक्रीवादळ आणि गारांच्या पावसांचा मोठा फटका बसला आहे. या चक्रीवादळात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना सरकारकडून प्रत्येकी 4 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे (Cyclone and hail storm in UP Kannauj).

चक्रीवादळामुळे अनेक झाडं रस्त्यावर पडली आहेत. याशिवाय अनेक विजेचे खांबदेखील पडले आहे. त्याचबरोबर शेतीचं आणि पोल्ट्री फार्मचंदेखील मोठं नुकसान झालं आहे.

विजेचे खांब कोसळल्यामुळे 12 पेक्षा जास्त गावांमधील वीज ठप्प झाली आहे. स्थानिक उपजिल्हाधिकाऱ्यांनी गावांमध्ये जावून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

कन्नोज जिल्ह्यात अगोदर अशाप्रकारचे चक्रीवादळ कधीही पाहिले नव्हतं, अशी प्रतिक्रिया तेथील नागरिकांनी दिली आहे. जिल्ह्यातील ठठिया क्षेत्रात एका व्यक्तीच्या डोक्यावर गारा पडल्याने मृत्यू झाला तर दुसरीकडे भिंत पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. एका व्यक्तीचा अंगावर झाडाची फांदी पडल्याने मृत्यू झाला. तर ट्रॅक्टरची ट्रॉली चक्रीवादळात पलटल्याने 8 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.

चक्रीवादळात 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 4 नागरिक जखमी आहेत. त्याचबरोबर चक्रीवादळामुळे 26 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.