Sunetra Pawar : सुनेत्रा पवार, जय पवार मुंबईत दाखल, राजकीय हालचालींना वेग

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार या त्यांचा मुलगा जय पवार यांच्यासह मुंबईत दाखल झाल्या आहेत. आज दुपारी राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि सर्व आमदारांची बैठक होईल. यावेळी सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड होणार आहे.

Sunetra Pawar :  सुनेत्रा पवार, जय पवार मुंबईत दाखल, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवार मुंबईत दाखल
Image Credit source: social media
| Updated on: Jan 31, 2026 | 12:36 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. बुधवारी त्यांचे विमान अपघातात निधन झालं. गुरूवारी (29 जानेवारी) बारामती येथे त्यांच्यावर शासकीय इतामामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या निधनानानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून आता सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. काल मध्यरात्री सुनेत्रा पवार या जय पवार यांच्यासह मुंबईतील देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्या. त्यांच्यासोबत नरेश अरोरा हे देखील मुंबईत आले. आज दुपारी विधान भवनात राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि सर्व आमदारांची बैठक होणार आहे. तर संध्याकाळी सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

दरम्यान आजच्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदारही मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. सुलभा खोडके, राजू कारेमोरे आणि राजकुमार बडोले हे मुंबईसाठी रवाना झाले आहेत. अनेक आमदार आज थोड्याच वेळात मुंबईत दाखल होतील. आज दुपारी महत्वाची बैठक होणार आहे. एकंदरच राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.

आज महत्वाची बैठक

काल दिवसभरात छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. त्यांची मुख्यमंत्र्यांशी बैठक झाली. या बैठकीनंतर अखेर सुनेत्रा पवार यांच्या नावावर उपमुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

आज दुपारी दोन वाजता विधान भवन येथे राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि सर्व आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत गटनेता निवडला जाणार आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी आणि राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईल. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता सुमित्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.

कार्यकर्त्यांना सांभाळण्याची भूमिका सुनेत्रा पवारांनी घेतली – प्रताप पाटील चिखलीकर

आज राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाची बैठक होईल, आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांचे नाव निश्चित होईल. त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होईल. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून मी वहिनीचे अभिनंदन करेन. एवढा मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर आणि महाराष्ट्रावर असताना कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून या सगळ्या गोष्टीला संमती दिली, असे आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले. कार्यकर्त्यांना संभाळण्याची भूमिका एक मायेचा आधार कसा द्यावा ही भूमिका वहिनी घेतली त्याबद्दल मी वहिनीचे आभार मानतो. आमच्या सगळ्या भावना आपण ओळखल्या आमच्या अंत:करणातला टाहो आपण ओळखला, दुःख बाजूला सारून माझा कार्यकर्ता माझे राष्ट्रवादी माझा महाराष्ट्र म्हणून जे मान्यता दिली त्याबद्दल मी अंतकरणापासून वहिनीचा आभारी आहे असंही त्यांनी नमूद केलं.