मोठी बातमी! सुनेत्रा पवारांचा राजीनामा, राज्यसभा खासदारकी सोडली

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर होत्या, या दौऱ्यात त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

मोठी बातमी! सुनेत्रा पवारांचा राजीनामा, राज्यसभा खासदारकी सोडली
Sunetra Pawar Resign
Image Credit source: Google
| Updated on: May 06, 2026 | 5:38 PM

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर होत्या, या दौऱ्यात त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणूकीत सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला होता. आता त्या विधानसभेच्या सदस्य बनल्या असल्याने त्यांना राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बारामती पोटनिवडणुकीतील विजयानंतर राजीनामा

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा सांभाळली होती. त्यांनी अजित पवार यांच्याकडे असलेले उपमुख्यमंत्रीपद आणि बीड आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्या राज्याच्या राजकारणात सक्रिय झाल्याने राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देणार हे जवळपास निश्चित झाले होते. आता बारामती विधानसभा पोटनिवडणूकीत विक्रमी मतांनी विजय मिळवल्यानंतर पवार यांनी खासदारकी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

अजितदादांचा रेकॉर्ड मोडला

बारामती हा पवार कुटुंबाचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. यापूर्वी अजित पवार यांनी याच मतदारसंघातून 1 लाख 65 हजार मताधिक्यांचा विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र, सुनेत्रा पवार यांनी आजच्या निकालात हा आकडा खूप मागे टाकला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, सुनेत्रा पवार यांनी तब्बल 1,18,930 मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवला आहे. पोटनिवडणुकीच्या इतिहासात इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून येणाऱ्या त्या पहिल्या महिला उमेदवार ठरल्या असाव्यात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

नव्या पर्वाची सुरुवात

सुनेत्रा पवार यांच्या या विजयाने बारामतीच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. 2 लाखांहून अधिक मताधिक्य मिळवणे ही केवळ लाट नसून सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वावर जनतेने दिलेली मोठी मोहोर आहे. या विजयानंतर बारामतीत कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला होता.

Follow Us