AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jay Pawar : जर विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावं, पण..बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवर जय पवार यांचं सूचक वक्तव्य

Jay Pawar : लवकरच बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे ही निवडणूक होत आहे. अजित पवार यांचे दोन्ही सुपूत्र आता राजकारणात हळूहळू सक्रीय होत आहेत. जय पवार यांनी या निवडणुकी संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

Jay Pawar : जर विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावं, पण..बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवर जय पवार यांचं सूचक वक्तव्य
Jay Pawar
| Updated on: Apr 04, 2026 | 4:11 PM
Share

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे सुपूत्र जय पवार हे बारामती पोटनिवडणूक, पवार कुटुंब आणि विमान अपघात अहवाल या विषयावर बोलले आहेत. ‘जर विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावं. बारामतीकर या निवडणुकीत काय करणार हे सर्वांना माहित आहे’ असं जय पवार बोलले आहेत. अजित पवारांशिवाय कधी लढावं लागेल असं इमॅजिन केलं होतं का? या प्रश्नावर जय पवार यांनी ‘आयुष्यात कधीच असं इमॅजिन केलं नव्हतं’ असं उत्तर दिलं. या निवडणुकीकडे कसं बघता? किती आव्हानात्मक आहे? ‘मी जास्त काही बोलू शकणार नाही. मी भावनिक आहे. मला सगळ्यांसमोर बोलायच नाहीय’

तुम्ही पत्रकार परिषद घेणार होता. ती लांबणीवर जातेय. काय कारण आहे? त्यावर जय बोलले की “काही कारण नाही. जे मुद्दे मला बोलायचे होते. ते रोहितदादांनी कव्हर केले. जो पर्यंत फायनल अहवाल येत नाही. तो पर्यंत उगाचच लोकांच्या मनात मतभेद करायचे नाहीत. जे काही आम्हाला वैयक्तीक वाटतं ते वाटतं पण मी फायनल अहवाल आल्यानंतरच बोलेन” रोहित पवारांच्या भूमिकेला तुमचा पाठिंबा आहे का?. ‘मी फक्त एवढचं म्हटलं की माझे मुद्दे त्यांनी कव्हर केलेत’ “मी त्या रोहित सिंहचे व्हिडिओ टाकले. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. बिल्डिंग पडली की मालकाला अटक होते. इंजिनिअरला होत नाही. हॉटेलला आग लागली की हॉटेल मालकाला अटक होते. मग इथे असं का होत नाहीय” असं जय पवार बोलले.

त्यावर पक्षातले वरिष्ठ नेते बोलतील

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर विचारलेल्या प्रश्नावर जय पवार बोलले की, “माझं व्यक्तिगत काही नाही. मी खूप छोटा आहे. पार्थ असेल वहिनी असतील पक्षाचे ज्येष्ठ नेते ठरवतील” विलिनीकरण व्हावं असं वाटतं का? या प्रश्नावर जय पवार बोलले की, “कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत. आम्ही परस्परांशी बोलतो. दादा गेल्यानंतर सगळं पवार कुटुंब एकत्र आलं. राजकारणाचा जो भाग आहे, त्यावर मी संभाषण करणं योग्य वाटत नाही. त्यावर पक्षातले वरिष्ठ नेते बोलतील”

Follow Us
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...