AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BIG BREAKING | शिंदे सरकारला सर्वात मोठा झटका! मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका राज्य सरकारकडून करण्यात आलेली. पण ही याचिका फेटाळण्यात आल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

BIG BREAKING | शिंदे सरकारला सर्वात मोठा झटका! मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
| Edited By: | Updated on: Apr 20, 2023 | 10:21 PM
Share

नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणबाबतची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी याचिका दाखल करण्यात आली होती. मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका राज्य सरकारकडून करण्यात दाखल आली होती. ही याचिका फेटाळण्यात आल्यामुळे आता मराठा आरक्षणचा मुद्दा पुन्हा अधांतरी राहिला आहे.

याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी या विषयी माहिती दिली आहे. “प्रश्न असा आहे की, मराठा समाजाने आतापर्यंत 4 मुख्यमंत्री पाहिले. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आरक्षण मिळालं. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे याचं सरकार पाहिलं. त्यानंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाचं सरकार पाहतोय. पण कुठल्याही सरकारने गांभीर्याने मराठा तरुणांना घेतलं नाही, हे अंतिम सत्य आहे”, असं विनोद पाटील म्हणाले.

‘आता शेवटचा पर्याय राहिला’

“शेवटचा पर्याय आता उरलेला आहे. राज्य सरकारने आतापर्यंत हा विषय गांभीर्याने घ्यावं, एवढचं म्हणणं मराठा समाजाच्या तरुण पिढीचं आहे. तापर्यंत सुमारे 38 ते 40 सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटीशन करण्यात आले आहेत. यामध्ये हायवेवर वाईन शॉप नसावे, परमीट रुम नसावे, देशी दारु नसावे, असा निर्णय घेतला होता. पण त्याच न्यायालयाने रिव्ह्यू पिटीशनमध्ये ते निर्णय बदलला आहे. अगदी इंदिरा गांधी यांनी राज घराण्याचा खालसा केला होता. तो निर्णयही बदलण्यात आला होता. आजपर्यंत असे 38 ते 40 निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतले आहेत”, अशी प्रतिक्रिया विनोद पाटील यांनी दिली.

सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारकडून काय भूमिका सांगण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रचंड गाजला होता. देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकेल यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडूनही त्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

विशेष म्हणजे ठाकरे सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकावं यासाठी एक विशेष समिती नेमण्यात आली होती. पण तरीही राज्य सरकारला मराठा आरक्षण वाचवण्यात यश आलं नाही. त्यानंतर सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. पण ती याचिका देखील फेटाळण्यात आल्याने मराठा आरक्षण हा मुद्दा पुन्हा अपूर्ण राहिला आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.