AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रिया सुळेंकडून पुन्हा नम्र विनंती, यावर्षी पाडव्याला गोविंदबागेत न येता डिजीटल शुभेच्छा द्या

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतकांना गोविंदबागेत न येता यंदाच्या वर्षी भेटीगाठी, यंदाची दिवाळी डिजीटल पद्धतीने साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.

सुप्रिया सुळेंकडून पुन्हा नम्र विनंती, यावर्षी पाडव्याला गोविंदबागेत न येता डिजीटल शुभेच्छा द्या
| Updated on: Nov 15, 2020 | 1:12 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसंच संपूर्ण पवार कुटुंबातील सदस्यांच्या एकत्रित उपस्थितीत बारामतीत परंपरेनुसार दरवर्षी साजरा होणारा दिवाळीचा सण तसेच दिवाळी पाडव्याला होणाऱ्या हितचिंतकांच्या स्नेहभेटी, शुभेच्छांचा पारंपारिक कार्यक्रम यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतकांना गोविंदबागेत न येता यंदाच्या वर्षी भेटीगाठी, यंदाची दिवाळी डिजीटल पद्धतीने साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. (Supriya Sule remember NCp Worker diwali padwa Event cancelled Due To Corona)

नागरिकांमध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा सामुहिक दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय पवार कुटुंबियांनी घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी दिवाळीत भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सहकाऱ्यांनी, हितचिंतक बंधु-भगिनींनी यंदा बारामतीला न येता आपापल्या घरुनच शुभेच्छा द्याव्यात, असं आवाहन पवार कुटुंबाने केलं आहे.

“गोविंदबागेतला शिरस्ता मोडत आम्ही पवार कुटुंबीयांनी या दिवाळीत कोणालाही भेटायचं नाही, असं ठरविलं आहे. आम्हा सर्वांना तुमची आपुलकी,प्रेम,स्नेह व आशीर्वाद यांची उणीव भासेल,याची आम्हाला जाणीव आहे. पण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि सर्वांच्या सुरक्षिततेसाठी भेटीगाठीचा दरवर्षीचा हा शिरस्ता मोडणं भाग आहे. आपण हे समजून घ्याल असा आम्हाला विश्वास आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“यापुर्वीही पवार कुटुंबीयांच्या वतीने याबाबतचे निवेदन प्रकाशित करण्यात आले होते.जर नजरचुकीने कोणाच्या वाचण्यात ते निवेदन आले नसेल, तर पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की, यंदाच्या दिवाळीत कृपया कोणीही भेटीसाठी बारामतीला येऊ नये. कोरोनाचे संकट टळल्यानंतर आपण सर्वजण पुन्हा एकदा मोठ्या उत्साहाने हा दिवाळीचा उत्सव साजरा करु”, असं त्या म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय, 

“आपण सर्वजण दिवाळीचा सण साजरा करतोय. दिवाळीच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आदरणीय पवार साहेब आणि कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी बारामतीला आवर्जून येतात. गेल्या काही दशकांपासून पवार कुटुंबीय आणि जनतेतील नात्याचे हे स्नेहबंध अधिक घट्ट करणारा हा शिरस्ता कायम आहे.दिवाळीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांचे प्रेम, शुभेच्छा, आशीर्वाद आम्हाला लाभतात. अर्थात हेच तर आम्हा सर्वांचं बळ आहे,जे आम्हाला वर्षभर पुरतं. पण यावर्षीचा सण हा नेहमीसारखा नाही.दिवाळीचा आनंद साजरा करताना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यावर काही मर्यादा आल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या मर्यादांचे भान सर्वांनाच राखावे लागणार आहे. यामुळेच मनावर दगड ठेवून,नेहमीचा शिरस्ता मोडत आम्ही पवार कुटुंबीयांनी या दिवाळीत कोणालाही भेटायचं नाही, असं ठरविलं आहे. आम्हा सर्वांना तुमची आपुलकी,प्रेम,स्नेह व आशीर्वाद यांची उणीव भासेल,याची आम्हाला जाणीव आहे. पण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि सर्वांच्या सुरक्षिततेसाठी भेटीगाठीचा दरवर्षीचा हा शिरस्ता मोडणं भाग आहे.”

“आपण हे समजून घ्याल असा आम्हाला विश्वास आहे. यापुर्वीही पवार कुटुंबीयांच्या वतीने याबाबतचे निवेदन प्रकाशित करण्यात आले होते.जर नजरचुकीने कोणाच्या वाचण्यात ते निवेदन आले नसेल, तर पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की, यंदाच्या दिवाळीत कृपया कोणीही भेटीसाठी बारामतीला येऊ नये. कोरोनाचे संकट टळल्यानंतर आपण सर्वजण पुन्हा एकदा मोठ्या उत्साहाने हा दिवाळीचा उत्सव साजरा करु. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हा सर्वांना आरोग्यदायी आणि सुखसमृद्धी आणणारी असो ही सदिच्छा…”

(Supriya Sule remember NCp Worker diwali padwa Event cancelled Due To Corona)

संबंधित बातम्या

गोविंदबागेत दिवाळी साध्या पद्धतीने होणार, एकत्रित जल्लोषाला पवार कुटुंबाकडून कात्री

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.