AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule : अंड्यांचं उदहारण देत खासदार सुप्रिया सुळे यांचं खासदार फुटीवर मार्मिक भाष्य

Supriya Sule : राजकारणातील भाषेचा दर्जा घसरतोय त्यावर त्यांनी अरुण जेटली यांच्या वक्तव्याची आठवण करुन दिली. ज्यावेळी भाषेच्या दर्जावरून प्रश्न समोर येतात तेव्हा अरुण जेटली यांचं वक्तव्य आजही आठवत.

Supriya Sule : अंड्यांचं उदहारण देत खासदार सुप्रिया सुळे यांचं खासदार फुटीवर मार्मिक भाष्य
Supriya Sule
| Updated on: Jun 29, 2026 | 10:38 AM
Share

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. साई दर्शनानंतर त्या संभाजीनगर येथील आंदोलनात सहभागी होणार आहेत. मीडियाशी बोलताना त्यांनी आज TET पेपर फूट आणि खासदार फुटीवर भाष्य केलं. महाविकास आघाडीला तडे गेलेले नाहीत. मविआ एकत्रच असल्याचा पुनरुच्चार त्यांनी आज केला. खासदार फुटीवर त्यांनी खूप मार्मिक भाष्य केलं. “कालच मी एक व्हिडिओ पाहिला. एक महिला अंडे विकत घेते. त्यावर महिला दुकानदाराला म्हणते ही अंडी घरी जाईपर्यंत फुटणार नाही ना ? त्यावर दुकानदार म्हणतो हे खासदार आमदार नाही फुटायला. हे दुर्देव आहे की एवढी चेष्टा लोकप्रतिनिधींची होते. प्रत्येकाला त्याचं मत किंवा पक्ष बदलायचा अधिकार घटनेने दिलाय. मात्र ज्या पद्धतीने सत्तेचा वापर करून हे केले जाते ते दुर्देव आहे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

उद्धव ठाकरे गटाचे खासदार फुटले. त्यावरही सुप्रिया सुळे बोलल्या. “आम्ही उद्धवजी यांच्या सोबत व संपर्कात आहोत. संजय राऊत यांच्या बरोबर देखील रोजचं बोलणं होतं. आम्ही देखील त्यांचा दौरा पाहतोय. ज्यांना मोठे केले ते असे वागत असतील तर ते दुःख होणार. महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी घसरतेय का असं आता वाटतं. शाहू, फुले, आंबेडकरांच्या राज्यात ही परिस्थिती आली ती खूप अवघड आहे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

तुम्ही दाखवणं बंद करा

राजकारणातील भाषेचा दर्जा घसरतोय त्यावर त्यांनी अरुण जेटली यांच्या वक्तव्याची आठवण करुन दिली. “ज्यावेळी भाषेच्या दर्जावरून प्रश्न समोर येतात तेव्हा अरुण जेटली यांचं वक्तव्य आजही आठवत. तुम्ही दाखवणं बंद करा..हे बोलणं बंद करतील असे ते म्हणायचे..भाषा आणि मराठी भाषेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मात्र जेटलींनी त्यावेळी सांगितलेल्या गोष्टी आजही खऱ्या ठरतायत” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ‘आमदार कशाला खासदार फुटणार ही देखील चर्चा आहे. त्यामुळे आम्हाला काय ते नवीन वाटत नाही’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पाप या सरकारने केलं

“काळया मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचं पाप या सरकारने केलं आहे. सत्ता आहे मात्र मदतीला कोणी धावून जात नाही. लाडकी बहीण योजनेत एक कोटी महिलांची नावे कमी झाली. निवडणुका संपल्या की बजेटची सावरसावर केली गेली. आज अनेक राज्यांसह देशाची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...