AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्रकारांना मारण्याची धमकी देताच सुषमा अंधारे संतापल्या, संजय दिना पाटलांना चांगलंच सुनावलं; म्हणाल्या, पैसा…

या राज्यात मुली सुरक्षित नाहीत. महिला सुरक्षित नाहीत. लोकलमधील प्रवासी सुरक्षित नाहीत. लोकप्रतिनिधींना विधिमंडळाच्या परिसरात धक्काबुक्की होते. म्हणजेच लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचेही काही खरे नाही. अधिकाऱ्यांना खुल्या धमक्या दिल्या जात आहेत. आता पत्रकारांनाही धमकी दिली जात आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

पत्रकारांना मारण्याची धमकी देताच सुषमा अंधारे संतापल्या, संजय दिना पाटलांना चांगलंच सुनावलं; म्हणाल्या, पैसा...
sushma andhare and sanjay dina patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 25, 2026 | 4:46 PM
Share

Sanjay Dina Patil : ठाकरे गटाला सोडून बंडखोरी करत संजय दिना पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. दरम्यान पक्षबदल केल्यानंतर तीनच दिवसांनी संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पत्रकारांना खुलेआम धमकी दिलेला व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. या प्रकरणानंतर आता ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय दिना यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय दिना यांच्या डोक्यात सत्ता गेली आहे. गृहमंत्र्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.

माणूस किती बदलू शकतो हे चित्र समोर

जोपर्यंत हे लोक आमच्यासोबत होते तोपर्यंत शिस्तीत होते. आता त्यांची शिस्त बिघडली आहे. संजय दिना यांच्याबाबत मला जास्त आश्चर्यकारक वाटत आहे. अवघ्या तीन दिवसांत पैसा आणि सत्ता किती डोक्यात जाऊ शकते. माणूस किती बदलू शकतो हे चित्र समोर दिसत आहे, असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला..

संजय दिना हे कमिश्नरलाही जुमानत नाहीयेत

तसेच, संजय दिना पाटील यांनी अर्वाच्य भाषेत पत्रकारांना धमक्या दिल्या. याची सर्वाधिक उत्तर ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतली पाहिजेत. त्याच कारण असं आहे की, संजय दिना हे बोलताना कोणत्या कमिश्नरकडे जायचं ते जा असं बोलून गेले. संजय दिना हे कमिश्नरलाही जुमानत नाहीयेत. कमिश्नर ज्या खात्यात काम करतात ते गृहखातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. या खात्याचे पालक गृहमंत्री देवेंद्र फडणीस आहेत. फडणवीस यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांना शिंदेंचे खासदार कस्पटासमान लेखले जात आहे. यावर गृहखात्याने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असी मागणीही त्यांनी केली.

आता पत्रकारांनाही धमकी दिली जात आहे

या राज्यात मुली सुरक्षित नाहीत. महिला सुरक्षित नाहीत. लोकलमधील प्रवासी सुरक्षित नाहीत. लोकप्रतिनिधींना विधिमंडळाच्या परिसरात धक्काबुक्की होते. म्हणजेच लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचेही काही खरे नाही. अधिकाऱ्यांना खुल्या धमक्या दिल्या जात आहेत. आता पत्रकारांनाही धमकी दिली जात आहे, असे म्हणत राज्याचं गृहखातं कोणाला सुरक्षा देण्यासाठी काम करत आहे. संजय दिना यांच्यासारखे उन्मत्त, गुंडगिरी करणाऱ्या लोकांना वाय प्लस सुरक्षा दिलेली आहे. या लोकांनी दिवसा पत्रकारांचे खून पाडावेत, यासाठीच दिना पाटील यांना सुरक्षा दिलेली आहे का? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?