Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणाल कामरावरून राजकारण तापलं, ‘मातोश्री’वर भुंकायची सुपारी राणेंना कोणी दिली? अंधारेंचा थेट सवाल

कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवसेना आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

कुणाल कामरावरून राजकारण तापलं, 'मातोश्री'वर भुंकायची सुपारी राणेंना कोणी दिली? अंधारेंचा थेट सवाल
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 24, 2025 | 7:17 PM

कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. साठ ते सत्तर शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या सेटची तोडफोड केली. कुणाल कामराने माफी मागावी अन्यथा त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा शिवसैनिकांकडून देण्यात आला आहे. कुणाल कामराच्या वक्तव्यावरून शिवसेना आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या अंधारे? 

संविधानानुसार प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मोकाट अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. कुणाल कामरा हे याच देशाचे नागरिक आहेत. त्यांना हे स्वातंत्र्य असायला हरकत नाही, कुणाल कामराच्या स्टेटमेंटमध्ये कुठेही आशलाघ्य भाषा नाही. कुठलाही कलाकार त्याचं म्हणणं उपासात्मक पद्धतीनं मांडू शकतो. लोकांनी सोलापूरकरांचा स्टुडिओ फोडला नाही, सुपारी देण्याची गोष्ट करणाऱ्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना या गोष्टीचा विसर पडला की सुपारी देण्याची प्रथा तुम्ही पाडली आहे. आम्ही त्याचे कधी भागीदार नाहीत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त मातोश्री वरतीच भुंकणे ही सुपारी राणेंना कोणी दिली?  असा हल्लाबोल यावेळी सुषमा अंधारे यांनी केला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी प्रशांत कोरटकरांच्या अटकेवरून देखील टीका केली आहे. प्रशांत कोरडकरला अटक केली यामध्ये महाराष्ट्र पोलिसांचं काय कार्य कर्तुत्व आहे? प्रशांत कोरटकरला अटक करायची असती तर ज्या दिवशी हे झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी अटक करू शकले असते. असं न करता महाराष्ट्र पोलिसांनी त्याला सुरक्षा पुरवली.  आत्ताची अटकेची कारवाई झाली आहे, ती तेलंगणा पोलिसांनी केलेली आहे. गुन्हे महाराष्ट्रात घडतात आणि आरोपी मात्र यूपी बिहार तेलंगणा इकडे सापडतात.  महाराष्ट्रात आरोपी सापडत नाहीत, फार फार तर महाराष्ट्रात आरोपी स्वतःहून हजर होतात, असंही यावेळी अंधारे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना
राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना.
'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी
'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी.
संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?
संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?.
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.