AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानात गेलेल्या नागपूरच्या सुनीताच्या मोबाईलमध्ये सस्पेक्टेड ॲप, सर्वच चक्रावले; पोलिसांनी व्यक्त केला सर्वात मोठा संशय

सुनीता जामगाडे या महिलेला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरुन अटक करण्यात आलेली असून तिची कसून चौकशी सुरु आहे. सुनीताच्या मोबाईलमध्ये काही सस्पेक्टेड ॲप आढळले आहेत, त्यामुळे पोलिसांनी मोठी भीती व्यक्त केली आहे.

पाकिस्तानात गेलेल्या नागपूरच्या सुनीताच्या मोबाईलमध्ये सस्पेक्टेड ॲप, सर्वच चक्रावले; पोलिसांनी व्यक्त केला सर्वात मोठा संशय
| Updated on: Jun 04, 2025 | 11:14 PM
Share

नागपूर येथील सुनीता जामगाडे या महिलेलापाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरुन अटक करण्यात आलेली आहे. सुनीता ही सीमा ओलांडून ती पाकिस्तानात गेली होती अशी माहिती समोर आलेली आहे. तसेच ती पाकिस्तातील काही लोकांच्या संपर्कात होती. त्यामुळे सुनीताची कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून सुनीताच्या मोबाईलमध्ये काही सस्पेक्टेड ॲप आढळले आहेत. त्यामुळे आता सुनीतावरील संशय आणखी वाढला आहे. याबाबत पोलिसांनी महत्वाची माहिती दिली आहे.

सुनीता पाकिस्तानातील तीन नागरिकांच्या संपर्कात होती

सुनीता जामगाडेच्या चौकशीबाबत माहिती देताना झोन 5 चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी सांगितले की, ‘सुनिता जामगडे आमच्या ताब्यात आहे. दोन मे पर्यंत तिला पोलीस कस्टडी होती आता ती न्यायालयीन कस्टडीत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुनीता पाकिस्तानातील तीन नागरिकांच्या संपर्कात होती. आता तिच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटची सखोल तपासणी केली जात आहे.’

पुढे बोलताना निकेतन कदम यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात सुनीताने सोशल मीडियावर पाकिस्तानी नागरिकांशी चॅटिंग केल्याचं स्पष्ट झालं आहे. या चॅटिंगची सुरुवातीला व्यवसाय करण्याबाबत झाली होती, मात्र नंतरच्या काळात चॅटिंगचा प्रकार बदलला, याची चौकशी सुरु आहे.

सुनीताला कारगिलला पोहोचण्यासाठी दोन स्थानिकांची

सुनीताच्या चौकशीतून काही जागांची नावे आम्हाला कळली आहेत, तसेच तिने कुठल्या जागेवरून बॉर्डर क्रॉस केली ते ठिकाण देखील समजलेलं आहे. सुनीता जामगडेने कश्मीरवरून कारगिलला पोहोचण्यासाठी दोन स्थानिक नागरिकांची मदत घेतली होती त्यांनी नावेही समोर आली आहेत. त्यांनाही लवकरच चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार आहे.

सुनीताच्या मोबाईलमध्ये सस्पेक्टेड ॲप

सुनीता जामगडे पाकिस्तानमध्ये गेली होती त्यावेळी भारत आणि पाकिस्तान मध्ये तणावाचा वातावरण होतं.त्यावेळी ती नऊ दिवस पाकिस्तानमध्ये पाकिस्ताननी एजन्सीच्या ताब्यात होती. तिच्या मोबाईलमध्ये काही सस्पेक्टेड ॲप सापडले आहेत पण हे ॲप पाकिस्तानी एजन्सीने इन्स्टॉल केले आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सुनीताच्या मोबाईलमधील ॲप ट्युबियस नावाने आहेत, हे कशासाठी वापरले जातात हे आताच सांगता येणार नाही. मात्र याद्वारे सुनीताने गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याचा संशय पोलिसांना आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.