पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी संघटनेची महसूलच्या संपामधून माघार, सामाजिक बांधिलकीचं कौतुक

मराठवाड्यातील महसूल विभागाचे सर्व (11 हजार) कर्मचारी आजपासून दोन दिवस संपावर जात आहेत.

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी संघटनेची महसूलच्या संपामधून माघार, सामाजिक बांधिलकीचं कौतुक

नांदेड: मराठवाड्यातील महसूल विभागाचे सर्व (11 हजार) कर्मचारी आजपासून दोन दिवस संपावर जात आहेत. तसेच या दोन दिवसानंतर सलग येणाऱ्या तीन सुट्ट्यांमुळे मराठवाड्यात महसूल विभागाचे कामकाज पाच दिवस ठप्प असणार आहे. मात्र या आंदोलनात तलाठी संघटना सहभागी होणार नाही. (Talathi organization detached from Revenue workers strike to inspection of farmers losses due to heavy rainfall)

अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप बाकी आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील तलाठी कर्मचारी महसूल संघटनेच्या संपात सहभागी होणार नाही. तलाठी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सय्यद आयुब यांनी संघटनेची भूमिका जाहीर केली आहे.

महसूल कर्मचाऱ्यांच्या सामूहिक रजा आंदोलनास आपला बाहेरून पाठिंबा असेल असे संघटनेने जाहीर केलं आहे. आपत्तीत अडकलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी तलाठी कर्मचारी कार्यरत राहणार असल्याचे संघटनेने कळवले आहे. शेतकऱ्यांशी थेट संपर्कात असणाऱ्या तलाठी मंडळींनी कामाप्रती दाखवलेली बांधिलकी कौतुकास्पद अशीच आहे.

तलाठी संघटनेची भूमिका

मराठवाडा विभागातील प्रलंबित पदोन्नती, प्रलंबित विभागीय चौकशी, फौजदारी गुन्हे अशी कारणे देऊन तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल कर्मचारी, अधिकारी, शिपाई, कोतवाल, नायब तहसीलदार, तहसीलदार यांची पदोन्नती तशीच रखडत ठेवली आहे.

बरेच तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल कर्मचारी, अधिकारी सेवा निवृत्त झाले, होत आहेत परंतु वेळोवेळी निवेदन देऊनही अद्याप या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. याच अनुषंगाने महसूल कर्मचारी संघटना औरंगाबाद विभागाने याबाबत निवेदन देऊन 1 ऑक्टोबर रोजी सामूहिक रजा आंदोलन पुकारले होते. त्यात महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने अगदीच कमी वेळात निर्णय घेऊन मराठवाडा विभागातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी तसेच तलाठी संवर्गातील नायब तहसीलदार यांना सूचित करून या आंदोलनास सक्रिय पाठिंबा देऊन आपला सहभाग नोंदवला होता.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत 1 ऑक्टोबर रोजी झालेल्या संघटनेच्या बैठकीत थोरात यांनी याप्रकरणी लवकरच सूचना देण्यात येतील आणि प्रश्न निकाली काढण्यात येईल असे सांगितले. तसेच सध्या ओला दुष्काळ आहे, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

आधी कोरोना आणि आता ओला दुष्काळ अशा दोन्ही बाजूने शेतकरी संकटात आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत दिवाळीपूर्वी त्यांना मिळावी अशी शासनाची अपेक्षा आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी, मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस यांच्याशी चर्चा करून सदरील आंदोलनातील दुसरा टप्पा म्हणजे दिनांक 28 आणि 29 ऑक्टोबर 2020 रोजीच्या महसूल कर्मचारी अधिकारी संघटनेच्या (मराठवाडा विभाग) सामूहिक रजा आंदोलनास महाराष्ट्र राज्य तलाठी संघ (मराठवाडा विभाग) बाहेरून पाठिंबा देत आहे.

संबंधित बातम्या

ठाकरे सरकारची मोठी घोषणा, अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींची मदत पुरेशी नाही, अजून निधी जाहीर करा – पंकजा मुंडे

ओला दुष्काळ जाहीर करा; लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत जाहीर करा; संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

(Talathi organization detached from Revenue workers strike to inspection of farmers losses due to heavy rainfall)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *