तळोजा औद्योगिक वसाहतीतील कारखान्याला आग, अग्निशमन दलाच्या जवानाचा गुदमरुन मृत्यू

तळोजा औद्योगिक वसाहती मधील कारखान्याला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाच्या एका जवानांचा गुदमरुन दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

तळोजा औद्योगिक वसाहतीतील कारखान्याला आग, अग्निशमन दलाच्या जवानाचा गुदमरुन मृत्यू

पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहती मधील कारखान्याला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाच्या (Taloja Industrial Colony Fire) एका जवानांचा गुदमरुन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आणखी काही जवानांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याची माहिती मिळत आहे. बाळू देशमुख असं मृत जवानाचे नाव आहे (Taloja Industrial Colony Fire).

औद्योगिक क्षेत्रात भूखंड क्रमांक जे-39 वर असलेल्या मोदी केमिकल या रसायनांवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याला शुक्रवारी (5 डिसेंबर) रात्री 12 च्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे पहाटे 5 वाजताच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं आहे.

मृत्यू झालेला अग्निशमन दलाचा जवान हा अंबरनाथ अग्निशमन दलाच्या पथकात कार्यरत असल्याची माहिती आहे. जखमी जवानांना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात या जवानाचा गुदमरुन मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने इतर जवानांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांमध्ये तळोजा औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दलाचे प्रमुख दीपक दोरुगडे यांचा देखील समावेश आहे (Taloja Industrial Colony Fire).

पुण्यातही टाकाऊ मालाला आग

पुण्यात आज पहाटे 3 वाजता काशेवाडी येथे मोकळ्या जागेत असणाऱ्या टाकाऊ मालाला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.

Taloja Industrial Colony Fire

संबंधित बातम्या :

पवईत रहिवासी इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल

गुजरातमध्ये COVID रुग्णालयाला भीषण आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू

कल्याण पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकींना आग, फटाक्याच्या ठिणगीने आग लागल्याची शक्यता

नायर रुग्णालयातील ओपीडी इमारतीची आग आटोक्यात, कोणतीही जीवितहानी नाही

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI