जलतरणाचे धडे गिरवणारा शिक्षक अवलिया, 3200 मीटरचं अंतर अवघ्या 2 तास 20 मिनिटात पार

लाटीपाडा धरणात पिंपळणेर ते सुकापूर न थांबता 3200 मीटर अंतर अवघ्या 2 तास 20 मिनिटांत पोहून पार केले.

जलतरणाचे धडे गिरवणारा शिक्षक अवलिया, 3200 मीटरचं अंतर अवघ्या 2 तास 20 मिनिटात पार
कैलास बच्छाव

धुळे : जिद्द, चिकाटी आणि प्रबळ इच्छाशक्ती, ध्येय डोळ्यासमोर ठेवून 49 वर्षीय (Teacher Kailas Bachhav) प्राथमिक शिक्षक कैलास बच्छाव यांनी येथील लाटीपाडा धरणात पिंपळणेर ते सुकापूर न थांबता 3200 मीटर अंतर अवघ्या 2 तास 20 मिनिटांत पोहून पार केले. चिंचदर (तालुका बागलाण) येथील कैलास बच्छाव  जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असून, मूळ रहिवासी असलेले पिंपळनेर येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी पांझरा नदीवरील लाटीपाडा धरणात काही दिवसांपूर्वी पोहण्याचा सराव सुरू केला (Teacher Kailas Bachhav).

सराव करतानाच शुक्रवारी तब्बल 580 मीटर अंतर 32 मिनिटांत पार केले. वीस वर्षांपूर्वी जेव्हा आपण पोहत होतो, त्यावेळी 60 ते 70 मीटर अंतर एका दमात पार करत असे. मात्र, पंधरा ते वीस वर्षांपासून पोहणे बंद होते. दरम्यान, कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात सुट्ट्या होत्या.

त्याचदरम्यान टीव्हीवर बीड जिल्ह्यातील 80 वर्षांच्या दिव्यांग वृद्धाने तरुणांना लाजवेल अशी बाईक चालवल्याचा व्हिडीओ बघितला. त्यातून मिळालेल्या ऊर्जेतून आपल्यालाही चांगलं पोहता येतं, त्यात काहीतरी नावीन्य करावं, असा निर्णय घेतला.

पोहणे उत्तम व्यायामही आहे. म्हणून रोज लाटीपाडा धरणात पोहण्याचा सराव सुरू केला. 50 ते 60 मीटर अंतर रोज पोहत होतो. एके दिवशी धरणाच्या सांडव्याचे 290 मीटर अंतर पार केले. पुन्हा जिद्द, चिकाटीने परत येताना तेवढेच अंतर पोहण्याचे ठरवले. त्यानुसार हे 3200 मीटर अंतर अवघ्या 2 तास 20 मिनिटांत पार केले. दरम्यानच्या काळात मुलाचाही एकाच आठवड्यात पोहण्याचा सराव करून घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

पोहायला येणे ही एक कला आहे. आत्मसात केली तर ती माणसाच्या जीवनाला तारक ठरते. खरे म्हणजे पाणी पाहिले की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते मात्र अवघड काम करताना मनात विनाकारण भीती बाळगू नये. कोणतीही गोष्ट अशक्य नाही. फक्त मनात जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. तरच अशक्य गोष्टी आपण शक्य करू शकतो (Teacher Kailas Bachhav).

पुस्तकी शिक्षणाचे धडे गिरवण्याबरोबरच आपल्या नजरेला भुरळ घालणारी कोणतीही गोष्ट आत्मसात करायची असेल तर त्यासाठी जिद्द चिकाटी प्रबळ इच्छाशक्ती डोळ्यासमोर ठेवूनच करावी असे प्रतिपादन देखील शिक्षक कैलास बच्छाव यांनी केले.

Teacher Kailas Bachhav

संबंधित बातम्या :

Special Story | आईसोबत भाजीविक्री, नंतर शिक्षक ते अधिकारी, सुदाम महाजन यांचा थक्क करणारा प्रवास!

‘दिल टूटा आशिक’ नावानं तरुणानं उघडलं चहाचं दुकान; लोकांची उसळली गर्दी

Special story | पाय कामातून गेल्यानंतर पोलिओवर औषध शोधण्यासाठी आयुष्य वेचणारा ‘हा’ अवलिया आहे तरी कोण?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI