तेलंगणाचे मुख्यमंत्री ‘केसीआर’ उद्धव ठाकरेंच्या भेटीला; तिसऱ्या आघाडीच्या चर्चेला जोर!

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणालेत की, 2019 च्या निवडणुकीपूर्वी अनेक विरोधी नेते आणि मुख्यमंत्र्यांना भेटलोय. मात्र, भाजप पुन्हा सत्तेत आल्याने अनेक गोष्टी बदलल्यात. सध्याची परिस्थिती देशासाठी घातक सिद्ध होतेय. ती दिवसेंदिवस चिघळतेय. त्यामुळे तिसरी आघाडी उभारू. त्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल. मात्र, या आघाडीचे नेतृत्व कोण करेल, यावर त्यांनी ठोस उत्तर दिले नाही.

तेलंगणाचे मुख्यमंत्री 'केसीआर' उद्धव ठाकरेंच्या भेटीला; तिसऱ्या आघाडीच्या चर्चेला जोर!
उद्धव ठाकरे आणि के. चंद्रशेखर राव.
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 2:53 PM

मुंबईः तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (KCR) अर्थातच के. चंद्रशेखर राव हे थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहेत. त्यासाठी ते मुंबईत पोहचले असून, त्यांचे सुप्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी स्वागत केले. सध्या ‘केसीआर’ तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांची ही भेट महत्त्वाची मानली जातेय. केंद्रातल्या भाजप (BJP) सरकारविरोधात वेगवेगळ्या राजकीय पक्षांची मोट बांधण्याचे संकेत नुकतेच ‘केसीआर’ यांनी दिले होते. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्याचा मनोदयही व्यक्त केला होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर ‘केसीआर’ आज उद्धव यांची भेट घेतायत.

केंद्राविरोधात आक्रमक

तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध अतिशय मधुर होते. मात्र, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राव सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. यापूर्वी त्यांनी अनेकदा थेट मोदींवरही शरसंधान साधले आहे. राव यांचा 17 फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता. हे निमित्त साधून मोदी यांनी ट्वीट करून त्यांना शुभेच्छाही दिल्या. मात्र, राव काही केल्या मवाळ झाले नाहीत. त्यांनी केंद्रातल्या भाजपविरोधात तिसरी आघाडी उभी करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्यात.

ममता हैदराबादला जाणार

राव यांनी यापूर्वीच 20 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. शिवाय त्यांची भेट घेण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हैदराबादला येणार असल्याचेही संकेत दिले होते. राव म्हणाले की, ममता बॅनर्जी यांनी मला फोन केला. त्यांनी मला बंगालमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. अथवा आपण हैदराबादला येऊ असे सांगितले. त्यांनी मला डोसा खावू घाला, अशी विनंती केली. मी त्यांचे कधीही स्वागत असल्याचे सांगितले. त्यामुळे ममताही लवकरच हैदराबादला भेट देऊ शकतात.

केंद्रावर सातत्याने टीका

राव यांनी गेल्या काही दिवसांपासून केंद्रातल्या भाजप सरकारवर जोरदार टीका केलीय. भाजपच्या जनतेविरोधी धोरणांविरोधात इतर पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहनही केले आहे. राव यांनी राफेल लढावू विमानाच्या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलाय. यातले खरे-खोटे जनतेसमोर आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जावू असा इशाराही पूर्वीच दिलाय. राव म्हणालेत की, 2019 च्या निवडणुकीपूर्वी अनेक विरोधी नेते आणि मुख्यमंत्र्यांना भेटलोय. मात्र, भाजप पुन्हा सत्तेत आल्याने अनेक गोष्टी बदलल्यात. सध्याची परिस्थिती देशासाठी घातक सिद्ध होतेय. ती दिवसेंदिवस चिघळतेय. त्यामुळे तिसरी आघाडी उभारू. त्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल. मात्र, या आघाडीचे नेतृत्व कोण करेल, यावर त्यांनी ठोस उत्तर दिले नाही. या पार्श्वभूमीवर आज होणारी राव आणि उद्धव भेट महत्त्वाची मानली जातेय. हे राजकारणाचे वेगळे वळण असू शकते का, याचे उत्तर येणारा काळच देईल.

इतर बातम्याः

पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला

‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात

शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.