ठाकरे बंधूंची लंच डिप्लोमसी, उद्ध ठाकरे ‘शिवतीर्थ’वर, राज्याच्या राजकारणात काय घडतंय?
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे, अखरे शनिवारी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, दरम्यान त्यानंतर आज शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने जल्लोष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता ठाकरे बंधूंची लंच डिप्लोमसी पहायला मिळत आहे.

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर अभिजीत दिपके आणि कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं. अखेर शनिवारी या आंदोलनाला मोठं यश आलं. धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीर 23 जुलै रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘शिवतीर्थ’वर संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परषदेमध्ये मोठी घोषणा करण्यात आली होती. 26 जुलै रोजी रविवारी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्यात येणार होतं. परंतु त्यापूर्वीच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानं रविवारी शिवाजी पार्कमध्ये ठाकरे बंधूंची जल्लोष सभा पार पडली. या सभेनंतर ठाकरे बंधूंची लंच डिप्लोमसी देखील पहायला मिळाली.
आज जल्लोष सभेसाठी ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आल्याचे पहायला मिळाले. शिवाजी पार्कवरील विजयी जल्लोषानंतर दोन्ही ठाकरे कुटुंबाची शिवतीर्थ निवासस्थानी भेट झाली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी ठाकरे बंधूंची पहिली पत्रकार परिषद 23 जुलैला ‘शिवतीर्थ’वर पार पडली होती. त्यानंतर याच आंदोलनाच्या निमित्ताने काल मातोश्रीवर ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद पार पडली. गेल्या वर्षी राजकीय मतभेद बाजूला ठेवून मराठी अस्मितेसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते. आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. जल्लोष सभेनंतर उद्धव ठाकरे हे ‘शिवतीर्थ’वर दाखले झाले. यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाल्याचं पहायला मिळालं.
दरम्यान दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली होती, या पत्रकार परिषदेमध्ये मुंबईत मोर्चा काढणार असल्याचा इशारा ठाकरे बंधूंकडून देण्यात आला होता, परंतु त्यापूर्वीच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याने आता ठाकरे बंधूंकडून आज मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात जल्लोष सभेचं आयोजन करण्यात आलं.
