AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटीच्या विलीनीकरणाबाबत ठाकरे सरकारची मोठी भूमिका; अनिल परब म्हणतात…

कामगारांचं म्हणणं होतं विलीनीकरण करावं आणि आमचं म्हणणं होतं की समितीसमोर विषय आहे. त्यामुळे निर्णय घेता येत नाही. त्यामुळे संप लांबतच चालला होता. विद्यार्थी आणि इतर वर्गाची गैरसोय होत होती. समितीचा अहवाल यायला उशिर असल्याने काय करायचं याचा विचार आम्ही करत होतो. आम्ही सरकारतर्फे एक प्रस्ताव ठेवला. विलीनीकरणाचा निर्णय समितीने सरकारकडे दिला तर तो मान्य असेल, असंही अनिल परब म्हणालेत.

एसटीच्या विलीनीकरणाबाबत ठाकरे सरकारची मोठी भूमिका; अनिल परब म्हणतात...
st strike
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Nov 24, 2021 | 7:05 PM
Share

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून एसटीच्या विलीनीकरणाची मागणी जोर धरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी मोठं विधान केलंय. एसटीच्या विलीनीकरणाचा निर्णय समिती घेणार असून, शासन निर्णय घेऊ शकत नाही, असंही अनिल परब म्हणालेत. अनिल परबांनी आज पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते.

विलीनीकरणाचा निर्णय समितीने सरकारकडे दिला तर

कामगारांचं म्हणणं होतं विलीनीकरण करावं आणि आमचं म्हणणं होतं की समितीसमोर विषय आहे. त्यामुळे निर्णय घेता येत नाही. त्यामुळे संप लांबतच चालला होता. विद्यार्थी आणि इतर वर्गाची गैरसोय होत होती. समितीचा अहवाल यायला उशिर असल्याने काय करायचं याचा विचार आम्ही करत होतो. आम्ही सरकारतर्फे एक प्रस्ताव ठेवला. विलीनीकरणाचा निर्णय समितीने सरकारकडे दिला तर तो मान्य असेल, असंही अनिल परब म्हणालेत.

सरकारने कामगारांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय

पण तो निर्णय येईपर्यंत किंबहुना तिढा असाच ठेवता येणार नाही. त्यामुळे सरकारने कामगारांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. ही वाढ त्यांच्या मूळ पगारात करण्यात येणार आहे. डीए दिला जातो, तो राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे दिला जातो. घरभाडे भत्ताही सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे दिला जातो. पगारवाढ राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्याचं आश्वासन दिलं होतं. करारात तसं होतं. विषय बेसिकचा होता. जे कर्मचारी एक वर्ष ते 10 वर्ष कॅटेगरीत आहेत, त्यांच्या मूळ वेतनात पाच हजाराची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय, अशी माहिती अनिल परब यांनी दिलीय.

घसघशीत पगार वाढ

जे कर्मचारी एक वर्ष ते 10 वर्ष कॅटेगिरीत आहेत. त्यांच्या मूळ वेतनात पाच हजाराची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचं मूळ वेतन 12 हजार 80 होतं त्यांचं वेतन 17 हजार 80 रुपये झालं आहे. ज्यांच मूळ वेतन 17 हजार होतं. त्यांना 24 हजार पगार होणार आहे. ही वाढ 41 टक्के आहे. आतापर्यंतच्या एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी वाढ आहे. 10 ते 20 वर्षापर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 4 हजाराने वाढ केली आहे. ज्यांचा पगार 16 हजार होता. त्यांचा पगार 23 हजार 40 झाला आहे. वाढ केल्यानंतर त्यांचा पगार 28 हजार झाला आहे. 20 वर्षे त्याहून अधिक असणाऱ्या कामगारांना 2 हजार 500 ने वाढ देण्यात येणार आहे. ज्यांचं मूळ वेतन 26 हजार रुपये होतं आणि त्यांचं स्थूल वेतन 37 हजार 440 रुपये होतं. त्यांचा पूर्ण पगार आता 41 हजार 40 झालं आहे. ज्यांचं मूळ वेतन 37 हजार होतं आणि स्थुल वेतन 53 हजार 280 रुपये होतं. त्यांचा मुळ वेतन 39 हजार 500 होईल, तर सुधारित वेतन 56 हजार 880 रुपये होईल, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Anil Parab Press Conference on ST Bus Workers Strike LIVE : एसटीच्या इतिहासातली सर्वात मोठ्या पगारवाढीची घोषणा, जाणून घ्या, कोणत्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका किती हजारानं वाढला ?

बैठकीचे फलीत : सोयाबीन दराबाबत सकारात्मक निर्णय, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपन्यांवर होणार गुन्हे दाखल

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...