AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना रुपाली चाकणकर देतात क्लिन चीट! भोंदूबाबा प्रकरणी सुषमा अंधारे यांच्याकडून मोठी पोलखोल

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांची मोठी पोलखोल केली आहे. शिवाय काही फोटो दाखवत याप्रकरणी कसून चौकशी झाली पाहिजे... असं देखील सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना रुपाली चाकणकर देतात क्लिन चीट! भोंदूबाबा प्रकरणी सुषमा अंधारे यांच्याकडून मोठी पोलखोल
सुषमा अंधारे
| Updated on: Mar 27, 2026 | 3:57 PM
Share

सध्या महाराष्ट्रात भोंदूबाबा अशोक खरातमुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. अनेक फोटो, व्हिडीओ आणि महिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर, खरात याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी अनेक मोठे खुलासे करत पुरावे देखील सादर केलेत. एवढंच नाही तर, संगितकार अनू मलिक यांच्यावर #MeeToo मोहिमेअंतर्गत फिल्म इंडस्ट्रीतील दोन महिलांनी गंभीर आरोप केलेले, ज्यावर रुपाली चाकणकर यांनी कोणती भूमिका घेतली आणि का घतली. याबद्दल देखील सुषमा अंधारे यांनी मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘संगीतकार अनू मलिक यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते…. फिल्म इंडस्ट्रीतील दोन ते तीन महिलांनी त्यांच्यावर लैगिंक अत्याचाराचे आरोप केले होते. #MeToo अभियानाअंतर्गत मलिक यांच्यावर अरोप करण्यात आलेले… मलिक यांच्या विरोधांत महिलांनी तक्रार रुपाली चाकणकर यांच्याकडे केली होती… पण चाकणकर यांनी अनू मलिक यांना क्लिन चीट दिली. चाकणकर यांनी मलिक यांना क्लिन चीट दिली कारण, अनू मलिक यांच्या प्रॉडक्शनचा एक सिनेमा तयार झालेला, ज्यामध्ये रुपाली चाकणकर यांच्या मुलाला काम मिळालं. हे काय प्रकरण आहे? असा प्रश्न देखील रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला.

पुढे अंधारे म्हणाल्या, ‘महिलांना न्याय देण्याऐवजी चाकणकर अशा प्रकारे डील करत असतील, तर हे वाईट आहे. तुम्ही अनू मलिक यांची केस गूगल करून बघा. माझ्याकडे ज्या लिंक्स आहेत त्या मी देते. या सगळ्यांध्ये सोहम चाकणकर, रुपाली चाकणकर सगळे दिसतील, ज्यामध्ये अनू मलिक देखील आहे. असं असताना देखील रुपाली चाकणकर हे नाव रेकॉर्डवर येत नाही. प्रश्न फक्त एक महिलेचा नाही… यावर चौकशी झालीच पाहजे…’, असं देखील सुषमा अंधारे… यावेळी त्यांनी काही फोटो देखील दाखवले.

अनू मलिक #MeeToo प्रकरणाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केलेले, त्यानंतर इंडस्ट्रीतील अनेक महिलांनी पुढे येत त्यांच्यावर ज्या सेलिब्रिटींनी अत्याचार केले, त्यांच्यावर विरोधात तक्रार केली होती. यामुळे अनू मलिक देखील वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ