ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या जागी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा, 213 कोटींच्या सुधारित निधीला मंजुरी

ठाणे जिल्हा रुग्णालयाचे (Thane District Hospital) श्रेणीवर्धन करून तिथे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची आग्रही मागणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली होती. या मागणीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करून अखेर या रुग्णालयाच्या उभारणीसाठी निधी मिळवून त्यांनी या रुग्णालयाच्या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या जागी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा, 213 कोटींच्या सुधारित निधीला मंजुरी
एकनाथ शिंदे, ठाणे जिल्हा रुग्णालय
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 10:18 PM

मुंबई : ठाणे येथील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाचे रूपांतर मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात (Multi Specialty Hospital) करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कारण राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीने हे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी 213 कोटींच्या सुधारित प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आधीचे 314 आणि आताचे 213 असे 527 कोटींचा निधी मंजूर झाल्याने या रुग्णालयाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे जिल्हा रुग्णालयाचे (Thane District Hospital) श्रेणीवर्धन करून तिथे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची आग्रही मागणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली होती. या मागणीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करून अखेर या रुग्णालयाच्या उभारणीसाठी निधी मिळवून त्यांनी या रुग्णालयाच्या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

ठाण्यातील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्याच्या मागणीला आरोग्य विभागाने मंजुरी दिली होती. तसेच याठिकाणी अद्ययावत रुग्णालयात उभारण्यासाठी 314 कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र त्यानंतर याजागी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी अतिरिक्त 213 कोटी रुपयांची गरज होती. आज झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन या सुधारित रक्कमेला मान्यता मिळाली आहे.

900 बेड्सचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार

जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या जागी 900 बेड्सचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार आहे, त्यात 200 मेटर्निटी, 200 सुपर स्पेशालिटी बेडस असतील तर उर्वरित 500 बेडस हे सर्वसाधारण बेडस असणार आहेत. याशिवाय प्रत्येक विभागात दोन स्वतंत्र आयसीयू उभारण्यात येणार आहेत. या रुग्णालयाची क्षमता तिप्पट होणार असून तिथे युरोलॉजी, अंकोलॉजी, ओंको सर्जरी सेक्शन, कारडीओलॉजी, कारडीओ व्हॅस्कुलर सेक्शन, नेफ्रॉलॉजी आणि डायलिसिस सेक्शन आशा सगळ्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे कर्करोग, मेंदूशी संबंधित आजार, श्वसनाशी संबधित आजार तसेच हृदयरोगावर उपचार घेणे शक्य होणार आहे. याशिवाय या रुग्णालयात वैद्यकीय तासिका घेण्यासाठी खास थिएटर, ट्रेनिंग हॉल एव्हढच नाही तर पेशंटला एअर लिफ्ट करून आणण्यासाठी हेलीपॅडची सुविधा देखील असणार आहे. 3 बेसमेंट आणि वर दहा मजल्याच्या दोन इमारती अशी याजागी उभारण्यात येणाऱ्या नवीन इमारतीची रचना असेल. या दोन्ही इमारतींना जोडण्यासाठी सातव्या मजल्यावर एक ब्रिज देखील असेल. तसेच वजनदार मशिन्स ठेवण्याची सोय या इमारतीच्या बेसमेंट सेक्शनमध्ये करण्यात येईल.

ठाणे सर्वसाधारण रुग्णालयाची सध्याची क्षमता 300 खाटांची आहे. त्यातही ठाणे, पालघर येथील लाखो रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयावर अवलंबून आहेत. या दोन्ही जिल्ह्यांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता हे जुने रुग्णालय कमी पडू लागले आहे. त्यामुळे लोकांची वाढती गरज लक्षात घेऊन उभारण्यात येणारे हे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय रुग्णासाठी उपयुक्त ठरणार आहे.

शिंदे, टोपेंकडून सातत्याने पाठपुरावा

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे आणि ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार यांनी या रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यानुसार सेना-भाजप युती सरकारमधील माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, विद्यमान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील यासाठी वेळोवेळी बैठका घेतल्या. शिंदे यांच्याकडे काही काळ आरोग्य मंत्रिपदाचा कार्यभार असताना त्यांनी या प्रस्तावाला गती देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता या रुग्णालयाच्या उभारणीसाठी लागणारा निधी मंजूर झाल्यामुळे लवकरात लवकर या रुग्णालयाच्या उभारणीचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

इतर बातम्या :

देशात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही, लॉकडाऊनचे निर्बंध लादण्याचा कोणताही निर्णय नाही: राजेश टोपे

Video : संत ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिरात राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते महापूजा: कीर्तनात सहभागी होत टाळही वाजवला!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.