AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तपासाला मोठं यश; आरोपीचे पिस्टल आणि मोबाईल हस्तगत

गेल्या आठवड्यात ठाण्यात शिवसेना नेते प्रदीप पूर्णेकर यांची निर्घृण हत्या झाली, ज्यामुळे राज्यभर खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला, ज्यात आता मोठे यश मिळाले आहे. ठाणे गुन्हे शाखेने आरोपीने वापरलेले पिस्तूल आणि मोबाईल फोन रायगडमधील जंगलातून हस्तगत केले आहेत. हे पुरावे प्रकरणाच्या तपासासाठी महत्त्वाचे ठरतील, ज्यामुळे पुढील तपासाला गती मिळेल.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तपासाला मोठं यश; आरोपीचे पिस्टल आणि मोबाईल हस्तगत
| Edited By: | Updated on: Oct 06, 2026 | 9:24 PM
Share

गणेश थोरात, रिपोर्टर : गेल्या आठवड्यात ठाण्यात घडलेल्या धक्कादायक हत्याकांडाने केवळ ठाणे शहरच नव्हे, तर मुंबईसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातच शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हल्लेखोरांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली होती. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातही मोठी प्रतिक्रिया उमटली होती. मंगळवारी रात्री प्रदीप पूर्णेकर यांना हल्लेखोरांनी संपवलं. त्यांनी आधी त्यांना मारहाण केली आणि त्यानंतर त्यांच्यावर दोन राऊंड गोळीबार केला. या हल्ल्यात पूर्णेकर गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेला आठवडा उलटून गेला असला, तरी या हत्याकांडामुळे निर्माण झालेली भीती आणि संताप अद्याप कायम आहे.

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही आक्रमक भूमिका घेतली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्णेकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. तसेच पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनीही पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान, या हत्याप्रकरणाच्या तपासाला आता महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. ठाणे गुन्हे शाखेने आरोपीने गुन्ह्यात वापरलेले पिस्टल आणि मोबाईल फोन हस्तगत केला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा जंगल परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी केली मोठी कारवाई

पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे शाखेकडून वेगाने सुरू आहे. तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्यात वापरलेले पिस्टल आणि मोबाईल फोन कर्नाळा परिसरात लपवल्याची महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कर्नाळा जंगल परिसरात शोधमोहीम राबवली. यादरम्यान पोलिसांनी आरोपीने लपवून ठेवलेले पिस्टल आणि मोबाईल फोन अखेर हस्तगत केले. त्यामुळे या हत्याप्रकरणाच्या तपासाला आता महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता आहे.

हस्तगत करण्यात आलेले पिस्टल आणि मोबाईल फोन हे तपासातील महत्त्वाचे पुरावे ठरू शकतात. या दोन्ही वस्तूंच्या माध्यमातून हत्येबाबत महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

 

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?