Ketki Chitale Bail : अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर, उद्या कारागृहातून सुटका होण्याची शक्यता

केतकीची उद्या 23 जून रोजी ठाणे कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे. अट्रोसिटी गुन्ह्या संदर्भात 16 जून रोजी जामीन मंजूर केला होता. मात्र, कळव्यात दाखल गुन्ह्यातील जामीन अर्जावर अद्याप न्यायालयाने सुनावणी राखून ठेवली होती. आज या जामीन अर्जावर सुनावणी करत निकाल दिला. केतकी सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात आहे.

Ketki Chitale Bail : अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर, उद्या कारागृहातून सुटका होण्याची शक्यता
अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूरImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 6:09 PM

ठाणे : कळवा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्या प्रकरणावर अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिला जामीन (Bail) मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधातील आक्षेपार्ह पोस्ट संदर्भात कळवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. केतकीला 20 हजार रुपये जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. केतकीची उद्या 23 जून रोजी ठाणे कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे. अट्रोसिटी गुन्ह्या संदर्भात 16 जून रोजी जामीन मंजूर केला होता. मात्र, कळव्यात दाखल गुन्ह्यातील जामीन अर्जावर अद्याप न्यायालयाने सुनावणी राखून ठेवली होती. आज या जामीन अर्जावर सुनावणी करत निकाल दिला. केतकी सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात आहे.

शरद पवार यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेवर ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन तिला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात तिला न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. दरम्यान केतकीने कळवा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्या प्रकरणी जामीन मिळवण्यासाठी वकिलामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला. 20 हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

केतकीने अॅड. नितीन भावेंची पोस्ट शेअर केली होती

अभिनेत्री केतकी चितळेने 14 मे रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत फेसबुकवर एक वादग्रस्त पोस्ट टाकली होती. एँड नितीन भावेची पोस्ट केतकीने शेअर केली होती. शरद पवारांविरूद्ध अत्यंत अनादरकार पोस्ट केली होती. पवारांचा आजाराचा संदर्भ घेऊन टीका केली होती. या पोस्टनंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली होती. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर केतकीला अटक झाली. सध्या केतकी ठाणे मध्यवर्ती कारागृहात आहे.

हे सुद्धा वाचा

रबाळे पोलिस ठाण्यातील गुन्ह्यासंदर्भातही केतकीला जामीन मंजूर

केतकीवर कोरोना काळात अॅट्रोसिटीचा गुन्हा नवी मुंबईच्या रबाळे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आठ महिन्यांपूर्वी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून केतकीने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, हा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्याच प्रकरणात रबाळे पोलिसांनी केतकीला अटक केली होती. या गुन्ह्यात केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, केतकीने रबाळे पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी वकिलामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने 16 जून रोजी केतकीला 25 हजाराच्या जातमुचलक्यावर व अटीशर्थींवर जामीन मंजूर केला.  (Actress Ketki Chitale granted bail, likely to be released from jail tomorrow)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.